Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis Saam Tv
मुंबई/पुणे

Video: मोठी बातमी! मुंबईत सेना-शिंदे गटात राडा! आमदार सरवणकरांचा हवेत गोळीबार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील धुसफूस आता चांगलीच वाढू लागली आहे. खरी शिवसेना कुणाची यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष राज्यात सुरु आहे. आता तर हा वाद टोकाला गेल्याचं दिसून येतं आहे. मुंबईच्या प्रभादेवीत परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे.

हा वाद मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा देखील आरोप आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. एका घरगुती प्रकरणाचा वाद झाल्याचं सरवणकर यांनी सांगितलं आहे.

यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत थोडक्यात बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. या संपूर्ण घटनेमुळे प्रभादेवी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी आता 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत यांच्यासह 20 ते 25 जनांवर गुन्हा दाखल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

SCROLL FOR NEXT