Third Mumbai Project Saam Tv
मुंबई/पुणे

Third Mumbai : 'तिसरी मुंबई नकोच', काय आहे हा प्रोजेक्ट आणि याला नागरिक का करतायत विरोध? वाचा...

Third Mumbai Project: तिसरी मुंबई प्रकल्पाला नागरिकांनी आपला विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावाच्या विरोधात 17 हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. नेमका काय आहे हा प्रकल्प आणि नागरिक याला विरोध का करत आहेत, हे जाणून घेऊ...

साम टिव्ही ब्युरो

गिरीश निकम, साम टीव्ही, मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात 'तिसरी मुंबई' नावाचे नवे शहर उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र या प्रस्तावाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. या प्रस्तावबाबत सरकारने हरकती अथवा सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार शासनाकडे तब्बल 17 हजार हरकती/सुचना प्राप्त झाल्या आहेत. शेकापचे जयंत पाटील यांनी या संदर्भात नगरविकास खात्याकडे प्रश्न विचारला असता नगरविकास खात्याने याबाबत हे उत्तर दिलं आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील २९, पनवेल तालुक्यातील ७, पेण तालुक्यातील ८८ मुंबई महानगर प्रादेशिक योजना क्षेत्रातील २ आणि रायगड प्रादेशिक योजना क्षेत्रातील ९ गावांचा समावेश तिसरी मुंबई प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी या १२४ महसुली गावातील परिसर अंदाजे ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरला असून तिसऱ्या नवी मुंबई निर्मितीची जबाबदारी सिडकोकडून काढून घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या प्रस्तावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाने दिनांक ४ मार्च, २०२४ रोजी अधिसूचना प्रसिध्द केली असता या अधिसूचनेला शेतकऱ्यांना दिनांक ६ एप्रिल २०२४ रोजी हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

त्यानंतर शेतकऱ्यांनी २५ हजार हरकतीच्या माध्यमातून प्रकल्पाला विरोध केला आहे का? असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला. त्यावर नगरविकास खात्याने उत्तर देताना 17 हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत अशी माहिती दिली. सदर फेरबदल प्रस्तावावर नियुक्त अधिकारी तथा सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्याकडे सुमारे १७ हजार हरकती/सुचना प्राप्त झाल्या आहेत.

तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीच्या प्रस्तावासाठी प्राप्त झालेल्या हरकती/सुचना व नियुक्त अधिकारी यांचा अहवाल तसेच त्यावरील संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अभिप्राय विचारात घेऊन, सदर फेरबदल प्रस्तावावर उक्त अधिनियमाच्या कलम २०(४) नुसार निर्णय घेण्याचे नियोजित असल्याची माहिती नगरविकास खात्याने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT