गावात बिबट्याच्या पिल्लामुळे नागरिकांची घबराट, कारण मात्र दुसरचं... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

गावात बिबट्याच्या पिल्लामुळे नागरिकांची घबराट, कारण मात्र दुसरचं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदीप भणगे

दिवा - कल्याण Kalyan ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आगसन गावातील राकेश बाळाराम पाटील यांच्या घराच्या आवारातून बिबट्याच्या Leopard पिल्लाने मांजरीची 3 पिल्ले उचलून नेली.त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे मुसळधार पाऊस दुसरीकडे सीसीटीव्ही CCTV मध्ये आढळलेला प्राणी. गेल्या 5 दिवसापासून मूलसधार पाऊस Rain पडतो आहे.कल्याण ग्रामीण, दिवा परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातच राहणे पसंद केले.

हे देखील पहा -

आगसन गावातील राकेश बाळाराम पाटील हे पण घरीच होते.पण अचानक त्यांना समजेल आपल्या आरावतील मांजरीची 3 पिल्ले गायब झाली आहे. म्हणून त्यांनी सीसीटीव्ही पाहिले तर मध्यरात्री बिबट्याच्या पिल्ला सारखा प्राणी घरच्या आवारात फिरत होता.हे गोष्ट गावात समजता गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण हा प्राणी नक्की कोणता आहे हे समजत न्हवते.गावातील रहिवासी रोहिदास मुंडे यांनी हे सीसीटीव्ही प्राणीमित्र निलेश भणगे यांना दाखवले.

प्राणीमित्र भणगे यांनी सीसीटीव्ही पाहून त्यांनी सांगितले, की हे बिबट्याचे पिल्लू नसून जंगली मांजर आहे. खाडी लागून असलेल्या खारफुटीत परिसरात आणि जंगलात रानमांजर आढळतात.पाऊस असल्याने आणि खाण्याच्या शोधत ते आले असावे. दिवा आणि कल्याण ग्राणीम भागत खारफुटी मोठ्या प्रमाणात आहेत, तेथून आले असावे.घाबरून जाण्याचे कारण नाही.तसेच राकेश मुंडे यांनी हे सीसीटीव्ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवले त्यांनीही रानमांजर असल्याचे सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : रायगड पोलीस भरती लेखी परीक्षा कॉपी प्रकरण, दहा जण गजाआड

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT