तिवसा गावात डेंग्यू सदृश्य आजार; उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल

तिवसा शहर व आंनदवाडीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक लोकांना आजाराची लागण होत आहे.
तिवसा गावात डेंग्यू सदृश्य आजार;  उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल
तिवसा गावात डेंग्यू सदृश्य आजार; उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुलअरुण जोशी
Published On

अरुण जोशी

अमरावती - जिल्ह्यतील तिवसा Tiwasa तालुक्यातील डेंग्यू Dengue सदृश्य आजार व व्हायरल फिव्हर Viral fever आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे तिवसा उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल झाले आहेत. तिवसा शहर व आंनदवाडीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक लोकांना आजाराची लागण होत आहे.

हे देखील पहा -

जिल्हात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात विविध आजार वाढत असल्याचे चित्र आहे. अस्वच्छता, सांडपाणी, नाल्यातील घाण त्यामुळे मच्छरच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सर्दी खोकला ताप यातून मलेरिया व डेंगू असे आजार नागरिकांना होत आहे.

तिवसा गावात डेंग्यू सदृश्य आजार;  उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल
अमरावतीकरांच 'चिअर फॉर इंडिया; ऑलिम्पिक खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा

पावसाळा आला की सोबत रोग घेऊन येतो, गेल्या महिन्यापासून तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आहे आहेत. लहान मुलापासून तर मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच आजाराचे लक्षण दिसून येत आहे. या रुग्णांवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिवसा रुग्णालयातील सर्व खाटा डेंग्यूच्या रुग्णांनी हाउसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिवसा व आनंदवाडीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com