Cidco Lottery Saam Digital
मुंबई/पुणे

Cidco Lottery: सिडकोकडून खुशखबर! घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय? वाचा

Cidco Home Application Date Extended : घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे अनेकजण सिडको, म्हाडाचे अर्ज भरतात. दरम्यान, सिडकोने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ केली आहे.

Siddhi Hande

मुंबई, नवी मुंबईत स्वतः चे घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. नवी मुंबईत परवडणारे घर घेण्यासाठी अनेकजण सिडकोत अर्ज करतात. सिडकोमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरे आहे. सिडको महामंडळाने सिडकोचे घर घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. (CIDCO Registration Date)

सिडकोतील घरांसाठी आता तुम्ही ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करु शकतात. सिडकोतर्फे याबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे,

नवी मुंबईच्या बाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, कंळबोळीमध्ये सिडकोची घरे आहे. तब्बल २६,००० फ्लॅटसाठी ही अर्जप्रक्रिया सुरु आहे.यामध्ये अर्जदारांना घरांचे प्राधान्य निवडण्याचेही स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या परिसरात घरे घेऊ शकतात. (CIDCO Registration)

अर्जदारांना पसंतीचे घर निवडताना मदत होण्यासाठी सिडकोतर्फे योजनेतील सदनिकांचे स्वरुप पाहता यावे याकरीता खारघर सेक्टर १४, तळोजा येथे अनुभूती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

यामुळेच ३१ जानेवारी २०२५ पर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात.https://cidcohomes.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.नोंदणी करुन सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

नवी मुंबईत स्वतः चे घर घेण्यासाठी ही उत्तम संधी आहे. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी लॉटरी जाहीर केली जाते. नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात तुमचे स्वतः च्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतः चे घर घ्यायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT