CIDCO Lottery 2026 Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोच्या ४,७७९ घरांसाठी लॉटरी, कुठे किती घरं अन् सोडत कधी निघणार?

CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत हक्काचे घर घेणं आता सोपं होणार आहे. सिडकोकडून तब्बल ४,७७९ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

Priya More
  1. सिडकोच्या ४७७९ घरांची लॉटरी जाहीर

  2. सिडको लॉटरीसाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार

  3. नवी मुंबईत हक्काचे घर घेता येणार

  4. सिडको लॉटरीमध्ये तळोजा, खारघर, कळंबोलीमध्ये घरं

नवी मुंबईमध्ये हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सिकडोने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गुड न्यूज दिली आहे. सिडकोच्या तब्बल ४७७९ घरांसाठी लॉटरी काढली आहे. १५ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.

सिडको महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ४,७७९ सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता www.cidcohomes.com या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. ज्यांना नवी मुंबईत सिडकोचे घर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

महत्वाचे म्हणजे सिडकोच्या या योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत आणि इतर सर्व शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपर्यंत असलेले आणि भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र असणार आहे. या लॉटरीसंदर्भातील सर्व निकष आणि अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.

तळोजा, कळंबोली आणि खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे, मेट्रो सुविधा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी www.cidcohomes.com या वेबसाईटला भेट द्यावी. नवी मुंबईतील तळोजा, खारघर आणि कळंबोली या प्राइम लोकेशनवर ही घरं असणार आहेत त्यामुळे या लॉटरीसाठी चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

सिडकोच्या लॉटरीतील घरं नेमकी कुठे आणि किती असणार?

तळोजा सेक्टर-३९ - ४,२२९ सदनिका

कळंबोली बस डेपो - २५७ सदनिका

खारघर बस डेपो - २९३ सदनिका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT