CIDCO announces 22,000 affordable homes in Navi Mumbai through Jumbo Lottery 2025. saam tv
मुंबई/पुणे

CIDCO Homes : दोन लाखांनी घरे स्वस्त होणार, निवडणुकीआधी सरकार घेणार मोठा निर्णय? सिडकोची आज महत्त्वाची बैठक

cidco home prices reduce : नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या किंमती दोन ते तीन लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून गृहखरेदीदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Namdeo Kumbhar

CIDCO Housing Prices May Drop : सिडकोच्या घराच्या किंमती कमी करण्यासाठी महायुती सरकारकडून तयारी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या घराच्या किंमती दोन ते तीन लाख रूपयांनी कमी होणार आहेत. पुढील काही दिवसात नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी सिडकोच्या घराची सोडत निघणार आहे. त्याआधी घराच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी सिडको आणि सरकारकडून पावले उचलण्यात येत आहे. घराच्या किंमती कमी करण्यासंदर्भात सिडकोची सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वाची बैठक पार होणार आहे. उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. (Navi Mumbai CIDCO flat price reduction news)

सिडकोच्या माझ्या पसंतीचे घर या योजनेंतर्गत घरांच्या किमतीवर ग्रहाकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. घरे तशीच पडून आहेत. त्यामुळे किंमती कमी कऱण्यासंदर्भात सिडकोकडून पावले उचलण्यात आली. त्यासाठी नगरविकास खात्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिंदेंसोबतच्या या बैठकीत किमती कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दर कपातीचा निर्णय झाल्यास हजारो सोडतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सिडकोच्या घराच्या किंमती कमी करण्यासंदर्भामध्ये आतापर्यंत चार वेळा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चार वेळा ही बैठक रद्द केली. वेगवेगळ्या कारणामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर घराच्या किंमती कमी करून सामान्यांना मोठा दिलासा देण्याबाबत शिंदेंकडून तयारी करण्यात येत असल्याचे बोलले जातेय. सोमवारी ही बैठक सह्याद्री इथे आयोजित करण्यात आली आहे.

नवी मुंबईसाठी गणेश नाईकांची फिल्डिंग -

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी ॲक्शन मोडवर आहेत. या दृष्टीने नवी मुंबई शहरातील मूलभूत पायाभूत सुविधा, प्रकल्पग्रस्त , समस्या सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी तसेच माजी नगरसेवकांच्या प्रभागांमधील समस्यांसाठी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे नवी मुंबईच्या प्रश्नांसाठी बैठकीसाठी वेळ मागितली आहे. या बैठकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आयुक्त सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक एमआयडीसीचे अधिकारी आणि भाजपचे माजी नगरसेवक उपस्थित असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT