cidco house price  Saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; १७ हजार घरे नवी मुंबईत कुठे उपलब्ध होणार?

cidco house price reduce : सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात करण्यात आलीये. या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Vishal Gangurde

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

१७ हजार घरांची लॉटरी लवकरच

नागपूर : नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते. त्यामध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उपमुख्यमंत्री ही घोषणा विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. यामुळे नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात तब्बल १७ हजार घरे बांधण्यात आली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे.

त्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. इडब्ल्यूएस आणि एलआयजी या प्रवर्गातील घरांच्या किमती १० टक्के कमी होतील, असेही त्यांनी निवेदनात सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; तारीख आली समोर

Maharashtra Live News Update: महाविकास आघाडीमधील पक्षाची पहिली बैठक सोमवारी

New Year Trip : मुंबई-पुणे मुंबई! न्यू इयर ट्रिप होईल खास, स्वस्तात मस्त ठिकाणांची यादी

Masala Sandwich Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल झणझणीत मसाला सँडविच पाव, ऑफिसवरून आल्यावर १० मिनिटांत बनवा

Rava Burfi Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी रवा बर्फी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT