Raghunath Kuchik Saam TV
मुंबई/पुणे

Raghunath Kuchik Case: ''अजूनही होणारा रक्तस्त्राव गर्भपाताची साक्ष देतोय''

'एका तरुण मुलीचं दुःख दुसरी महिला समजू शकत नाही का ? एव्हढा निगरगट्टपणा ? पोलिसांना लेखी देऊनही तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट न करण्यासाठी कोण पडद्यामागून पोलिसांचे हात बांधून ठेवतंय? '

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर एका तरुणीवर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आता या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसंच चित्रा वाघ या पोलिसांसमोर खोटं बोलत असल्याची टीका आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवरच आता चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर ट्विटद्वारे निशाना साधला आहे. तसंच ही लढाई आपण लढतच राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहंल आहे की, 'राष्ट्रवादीच्या (NCP) महिला अध्यक्षाच्या पतीने तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात महत्वाच्या व्यक्तीने 'तीचं शोषण केलंय' याची शहानिशा व्हायला नको का न्यायासाठी सत्ताधारी महिला नेत्यांनीही पाठ फिरवल्यावर शेवटी मोठ्या आशेने ती माझ्याकडे आली. त्याचाही त्रास व्हावा? असा सवाल त्यांनी उपस्थित करत रुपाली चाकणकरांवरती निशाना साधला आहे.

तसंच बलात्कार पीडिता सांगतीये तिला इंजेक्शन देण्यात आलं होतं. तिची ब्लड टेस्ट करणे पोलिसांसाठी बंधनकारक होते कुणाच्या अदृश्य दबावामुळे ती टेस्ट केली नाही? 4 वेगवेगळ्या ठिकाणी तिचा जबरदस्तीने गर्भपात केलाय. अजूनही होणारा रक्तस्त्राव याची साक्ष देतोय. एका तरुण मुलीचं दुःख दुसरी महिला समजू शकत नाही का ? एव्हढा निगरगट्टपणा ? पोलिसांना लेखी देऊनही तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट न करण्यासाठी कोण पडद्यामागून पोलिसांचे हात बांधून ठेवतंय? पीडितेला खोटं ठरवण्यासाठी बलात्काऱ्याच्या मुलीला पुढे करण्याची चाल कोणत्या मंथरेची आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

स्वपक्षीय बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्तेतील अधम महिला नेतृत्वाच्या राज्यात दुसरी पूजा चव्हाण होऊ द्यायची नाही या निर्धाराने मी पीडितेच्या मागे संपूर्ण ताकतीने उभी राहिलेली बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलीये. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूचं असेल असा इशाराही या ट्विटद्वारे दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT