Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Chinchwad By Election: 'त्यामुळेच चिंचवडमध्ये पराभव...' अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; कोणावर फोडले खापर?

Pune By Election Result: विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी संपूर्ण ताकद लावूनही या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना पराभव स्विकारावा लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chinchwad By Election Result: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघ भाजपच्या हातून निसटला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. एकीकडे कसब्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला असतानाच चिंचवडमध्ये मात्र महाविकास आघाडीला पराभव स्विकारावा लागला आहे.

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी संपूर्ण ताकद लावूनही या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना पराभव स्विकारावा लागला आहे. या पराभवानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Chinchwad By Election)

काय म्हणाले अजित पवार...

चिंचवडमधील पराभवानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कसब्यातील विजयाची आणि चिंचवडमधील पराभवाची कारणे सांगितली. "कसब्यात आणि चिंचवडमध्ये मी प्रचार करत होतो. चिंचवडमध्ये प्रचार करत असताना मला काही माहिती येत होती. राहुल कलाटे यांना सत्ताधारी कशी मदत करत होते, याची मला माहिती येत होती."

"सत्ताधाऱ्यांनी कलाटे यांना मदत केल्यामुळेच आमचा पराभव झाला. मी कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं अनेकवेळा आवाहन केलं होतं. आता नानाला संधी देऊ असं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही," असं अजित पवार म्हणाले.

याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "कलाटे आणि नाना काटे यांची मते पाहिली तर ती मते भाजपच्या उमेदवारांपेक्षाही अधिक आहे. बंडखोरी झाली नसती तर चित्रं वेगळं दिसलं असतं. मागच्यावेळी कलाटेंना लाखभर मते मिळाली. पण यावेळी त्यांना ती मते मिळाली नाहीत. पण त्यांनी स्वत:ची मते घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला," असेही अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband - Wife : बायको अचानक नवऱ्याच्या जीवावर का उठते? कारणे आणि आकडेवारीही धक्कादायक, सर्वाधिक घटना कोणत्या राज्यात?

Maharashtra Weather: राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण विदर्भाचं हवामान कसं असणार?

Fact Check: रेशन कार्ड बंद होणार? जनता लाभांपासून वंचित राहणार?

Maharashtra News Live Update: Dhule: धावत्या पुणे -दानापूर एक्सप्रेसमध्ये दिसला साप; प्रवाशांची पळापळ, ट्रेन थांबवून बोगी केली रिकामी

आमदारांची पेन्शन बंद होणार? आमदारांच्या पेन्शनविरोधात याचिका

SCROLL FOR NEXT