मुंबई: काल मंगळवारी ईडीने (ED) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटनकर यांच्यावर कारवाई केली. यावर आज भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उध्दव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे पारिवारीक संबंध असल्याचा आरोप केला. यावरुन आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी 1999 चा संदर्भ देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी केली आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी बाबत मी गेल्यावर्षी पासून बोलत आहे. तो कुठे आहे हे समोर आले पाहिजे. मी गेल्यावर्षीपासून या संदर्भात ट्विट (Tweet) करत आहे. या नंदकिशोरच्या माध्यमातून हवाला झाला आहे. हा कुणाचा पार्टनर आहे, कुणाचा माणुस आहे. कुठल्या सेनेच्या आमदार आणि माजी मंत्र्यांचे ते पार्टनर आहेत. यात फक्त मुख्यमंत्री यांचा मेव्हनाच आहे का? हे पाहणे महत्वाच आहे, असही राणे म्हणाले.
नंदकुमार चतुर्वेदी आता कुठे आहेत.त्यांचा मनसुख हिरेन तर केला नसेल असही ते म्हणाले. यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी 1999 चा संदर्भ दिला. 1999 मध्ये राज्यात सेनेचा (Shivsena) मुख्यमंत्री होता. तेव्हा मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्यावर आरोप झाला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
Edited By - Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.