Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde Speech: राज्याच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

आज देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आज देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहे त्या निमित्त संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज्याच्या विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी दिली.

मागिल अडीच वर्षात कोव्हीडच संकट राज्यावर होतं. यंदा मात्र दहीहंडी आणि गणपती उत्सव जल्लोषत साजरा करणार आहोत. मागील 2 महिन्यात अतिवृष्टी मुळे मोठ नुकसान झालं आहे 15 लाख हेक्टर जमीन बाधित झालं आहे. एनडीआरएफ पेक्ष दुप्पट मदत जाहिर केली आहे. आम्ही नद्याच खोलीकरण करत आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, धनगर समाज, ओबीसींना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्न सरकारचे सुरू आहेत. बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळाले आहे. दुर्बल घटकांच्या विकासासाठी अमृत संस्थेला उभारी देण्यात येत आहेत.

स्टार्टअपसाठी सरकारकडून पाठबळ देण्यात येत आहेत. नवीन उद्योजक तयार होतील याकडे लक्ष देत आहोत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण योजना आणि त्यातून उद्योग उभारणीसाठी सरकारकडून मदत देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, 28 जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे 15 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. सुमारे 15 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे . पूर आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

आमचे गुरुजी उपक्रम

राज्य सरकार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारने 'आमचे गुरुजी' उपक्रम सुरू निर्णय घेतला आहे. यामध्ये शिक्षकाचे छायाचित्र आणि माहिती असणार आहे. यातून विद्यार्थी आणि पालकांना शिक्षकांची ओळख होईल. राज्यात कोणतीही शाळा एक शिक्षकी राहणार नसल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा, २४ तास पोलीस तैनात राहणार, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Politics: 'मी रमीचा खेळाडू नव्हे, तर...'भाजपमध्ये प्रवेश करताच सांगळेंचा मंत्री कोकाटोंवर घणाघात

Maharashtra Live News Update: कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण; सोशल मीडियावर हत्येचं समर्थन करणारा व्हिडिओ पोस्ट

SCROLL FOR NEXT