Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde | लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही : एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे विधानसभेत भावूक झाले.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारची बहुमत चाचणी पार पडली. या चाचणीत सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. दरम्यान, बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी 'लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार घेणार नाही', असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. (Eknath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी 50 आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही.”

'सुनिल प्रभु यांना माहिती आहे, माझं कशाप्रकारे खच्चीकरण झालं. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल पण आता मी मागे हटणार नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. 'मी मतदानाच्या दिवशी निघून आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांनी सांगितलेलं आठवलं की अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही. हा विश्वास आहे', असंही मुख्यमंत्री म्हणालेत. (CM Eknath Shinde Live)

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन', असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT