Chicken shawarma Food Poision Saam TV
मुंबई/पुणे

Chicken Shawarma : चिकन शोरमा खाल्ल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Chicken shawarma Food Poision: मुंबईच्या मानखुर्दमध्ये रस्त्यावर तयार होणार चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली आहे. यामध्ये १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू देखील झाला आहे.

Satish Daud

मुंबईच्या मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर तयार होणार चिकन शोरमा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली आहे. यामध्ये १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी शोरमा विक्रेत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रथमेश भोकसे (वय १९) असं मृत तरुणाचे नाव आहे. विषबाधा झालेल्या इतर व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये शोरमा विक्रीच्या गाडीवरून प्रथमेशसह परिसरातील अनेक नागरिकांनी चिकन शोरमा खाल्ला होता.

शोरमा खाताच त्यांना मोठ्या प्रमाणात उलटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. यात प्रथमेश याचा देखील समावेश होता. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने प्रथमेशला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

मात्र, उपचार सुरू असताना त्याची प्रकृती आणखीच खालावली. त्यामुळे प्रथमेशचा मृत्यू झाला. सध्या इतर १० ते १२ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी शोरमा विक्रेत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.

शोरमातील चिकन खराब असल्याचा पोलिसांना संशय आहे. काही दिवसांपूर्वी चिकन शोरमा खाऊन गोरेगावमधील १२ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. गोरेगाव पूर्वेकडील संतोषनगरमध्ये ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्त्यावरील वाहतूक बंद, पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी; काय आहे कारण?

पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत भेंडीची भजी; हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Badlapur: बदलापूर हादरले! उल्हास नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT