Easy Rangoli Designs For Diwali: दिवाळीसाठी सोप्या 5 रांगोळ्या, डिझाईन्स आत्ताच सेव्ह करून ठेवा

Manasvi Choudhary

दिवाळी सण

दिवाळी सणाला रांगोळी काढण्याला विशेष महत्व आहे. दारात रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते.

Diwali | pinterest

दिवाळी रांगोळी डिझाईन्स

दिवाळीसाठी तुम्हालाही सुंदर रांगोळी काढायची असेल तर ५ सोप्या डिझाईन्स पाहून घ्या.

Easy Rangoli Designs For Diwali | yandex

झेंडूच्या फुलांची रांगोळी

रांगोळीचे रंग वापरण्यासाठी वेळ नसेल तर झेंडूची पिवळी आणि केशरी फुले बेस्ट आहेत. दाराच्या उंबऱ्याजवळ एका छोट्या वर्तुळात किंवा अर्धचंद्राकृती आकारात या फुलांच्या पाकळ्या पसरवा.

Marigold Flower Rangoli

दिवा ठेवा आणि रंगीत वर्तुळ काढा

जमिनीवर मध्यभागी एक सुंदर जळता दिवा किंवा समयी ठेवा. दिव्याच्या चारी बाजूंनी ३ ते ४ वेगवेगळ्या रंगांचे गोल काढा. त्यानंतर पांढऱ्या रांगोळीने त्या वर्तुळांच्या कडांवर नाजूक ठिपके देऊन बोटाने आतल्या बाजूने ओढा.

Diwali Rangoli | yandex

ठिपक्यांपासून सुंदर फूल व छोटी वेल

५ किंवा ७ ठिपके समोरासमोर ठेवून साध्या रेषेने जोडा आणि एक नाजूक फूल तयार करा. या फुलाच्या बाजूने दाराच्या दोन्ही कडांवर छोटीशी वेलीची डिझाईन काढा.

Dot Flower & Floral Creeper | yandex

कमळाची सोपी रांगोळी

कमळ हे माता लक्ष्मीचे प्रिय फूल मानले जाते. त्यामुळे दिवाळीत कमळाची रांगोळी काढणे अत्यंत शुभ असते. दोन सोप्या अर्धचंद्राकृती रेषा काढून त्याला पाकळ्यांचा आकार द्या.

Simple Lotus Rangoli

पारंपरिक दिव्याची रांगोळी

दिवाळीसाठी दिव्याची रांगोळी सर्वात सोपी आणि सुटसुटीत असते. खाली एक मोठा दिव्याचा आकार काढून त्यात पिवळा, लाल किंवा नारंगी रंग भरा.

Traditional Diya Rangoli

NEXT: Makyacha Chivda Recipe: पोह्यांचा चिवडा खाऊन कंटाळा आला असेल तर मक्याचा कुरकुरीत चिवडा बनवा, सोपी आहे रेसिपी

Makyacha Chivda Recipe
येथे क्लिक करा...