Manasvi Choudhary
दिवाळीत पोह्याचा चिवडा बनवतात. पोह्यांचा कुरकुरीच चिवडा खायला सर्वानाच आवडतो.
पण तुम्ही नेहमीचा पोह्याचा चिवडा खाऊन कंटाळात असाल तर यंदा मक्याचा चिवडा बनवा.
मक्याचा चिवडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने हा चिवडा बनवू शकता.
मक्याचा चिवडा बनवण्यासाठी मका, शेंगदाणे, डाळी, काजू, मनुके, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, पिठीसाखर, तेल, तूप, मीठ हे साहित्य वापरा.
मक्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वातआधी गॅसवर कढईमध्ये तेल किंवा तूपामध्ये कॉर्न हलकेसे कुरकुरीत फ्राय करून घ्या. कॉर्न कुरकुरीत झाल्यानंतर एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या.
नंतर त्याच कढईत शेंगदाणे फ्राय करा. शेंगदाणे फ्राय झाले की त्यात काजू, मनुके आणि डाळी फ्राय करा. नंतर या कढईत हिरवी मिरची आणि कढीपत्ता पाने चांगले खरपूस फ्राय करून घ्या.
त्यानंतर त्यात हळद आणि चिमूटभर हिंग घाला. नंतर या मिश्रणात परतून घेतलेले कॉर्न मिक्स करा. चिवड्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर मिक्स करा. अशाप्रकारे कुरकुरीत कॉर्न फ्लेक्स चिवडा तयार होईल.