Chhagan Bhujbal saam tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal: संभाजी भिडे यांच्यावरील वक्तव्यानंतर भुजबळांना धमकी; पोलीस विभागाकडून सुरक्षेत वाढ

chhagan bhujbal News: कानाखाली देणाऱ्याला १ लाख रुपये घोषणा करण्यात आली होती. या धमकीनंतर पोलीस विभागाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Vishal Gangurde

chhagan bhujbal News: अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्यावर केलेल्या वक्तव्य केलं होतं. भुजबळांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांना कानाखाली मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच कानाखाली देणाऱ्याला १ लाख रुपये घोषणा करण्यात आली होती. या धमकीनंतर पोलीस विभागाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. (Latest Marathi News)

एका वृत्तानुसार, परशुराम सेवा संघाच्या विश्वजीत देशपांडे यांनी भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला 1 लाख रुपयांची घोषणा केली होती. भुजबळांनी धमक्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. 'ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी ही नाव का असत नाही, असं विधान भुजबळांनी केलं होतं.

छगन भुजबळ यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रया येत होत्या. ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी छगन भुजबळांनी स्वत:चं नाव बदलण्याचं आव्हान दिलं होतं. इतरांबद्दल बोलण्याआधी त्यांनी स्वतःच्या घरातली नाव बदलावी, असे दवे म्हणाले होते.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर भुजबळांनी टीका केली होती. भुजबळ म्हणाले होते, संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही स्पष्ट करावं. त्यांना संभाजी भिडे नाव घेण्याची गरज का भासली. त्यांनी आपापल्या नावाने प्रबोधन करावे. परंतु असं नाव घेऊन बहुजन समाजात जायचं. ते बरोबर नाही. आम्ही त्याला विरोध करणार, असे ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT