Chhagan Bhujbal  Saam Tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal: अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडमध्ये; गोरगरीब कुटुंबांसाठी अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे निर्देश

Chhagan Bhujbal: शिधापत्रिका लवकर लवकर दिल्या जाव्यात, यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

Vishal Gangurde

Chhagan Bhujbal News In Marathi

गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य मिळावेत. तसेच गरीब कुटुंबांची अडवणूक न करता त्यांना शिधापत्रिका लवकर लवकर दिल्या जाव्यात, यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. (Latest Marathi News)

आज मुंबईतील आझाद मैदानात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने रेशन दुकानांतून स्वस्त धान्य मिळावे आणि इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलक महिलांच्या शिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या महिलांनी त्यांच्या समस्या मंत्री छगन भुजबळ यांच्यापुढे मांडल्या. यानंतर छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

काय आहे महिलांची तक्रार?

महिलांनी छगन भुजबळ यांना रेशन दुकानावर २ किंवा ३ रुपये किलो रुपयांनी मिळणारे धान्य आता मिळत नाही अशी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांचा गैरसमज दूर सर्वत्र आपण मोफत धान्य वाटत आहोत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

तसेच महिलांकडून रेशन दुकानदारांकडून संपूर्ण धान्य देण्याऐवजी अर्धवट धान्य देऊन फसवणूक केल्याची तक्रार या महिलांची होती. या दुकानदारांवर कडक करून परवाना रद्द करू असा विश्वास भुजबळांनी आंदोलक महिलांना दिला.

तत्पूर्वी, या महिलांनी रेशन दुकानात केरोसीन (रॉकेल) मिळत नसल्याचीही तक्रार दिली. केरोसीन पुन्हा उपल्बध झालं पाहिजे, अशी मागणी या महिलांनी केली. केरोसीनची मागणी केल्यानंतर कोर्टाने उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसीन देऊ नये असे निर्देश दिले असल्याचे सांगितले.

मात्र, याबाबत सरकारची कोर्टात लढाई सुरु असल्याती माहिती त्यांनी महिलांना दिली. लवकरच कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन भुजबळ यांनी महिलांना दिलं.

तत्पूर्वी, छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळासमोरच अधिकाऱ्यांना फोन केला. भुजबळ यांनी फोन करत लवकरात लवकर सर्व प्रश्न सोडवून. प्रत्येक लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायला हवे. तसेच योग्य कारवाईचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात बंजारा समाजाचे आरक्षण मागणीसाठी आंदोलन

GK: जगातील सर्वाधिक तलाव असलेला देश कोणता? जाणून घ्या सविस्तर रंजक माहिती

Samruddhi Kelkar: जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साजे केसात...

Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

SCROLL FOR NEXT