Chhagan Bhujbal  Saam tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal : विधानसभेत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत; लोकसभेपूर्वीच अजित पवार गट आक्रमक

Chhagan Bhujbal on maharashtra assembly election 2024 : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यााआधीत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जागावाटपावर मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Vishal Gangurde

सुनील काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून लगबग सुरु होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीकडून विधानसभेत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भरसभेत मागणी केली आहे.

राज्यातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुंबईत अजित पवार गटाची पहिली कार्यकारिणी बैठक पार पडत आहे. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुणीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, पहिली निवडणूक संपली आहे. तोच दुसरी निवडणूक सुरु झाली आहे. आचारसंहिता सुरु होतील. आचारसंहिता सुरु झाल्यामुळे काम थांबतील. माझं मुख्यमंत्र्यांना सांगण आहे की, मार्ग काढायला पाहिजे. जेणेकरून आमदारांना ताकद मिळेल. भाजपने ४०० पारचा नारा दिलाय, त्यामुळे विरोधकांकडून दलित समाजात संविधान बदलणार हे सांगितलं गेलं. ते लोकांच्या मनातून काढण्यासाठी नाकीनऊ आले. पंतप्रधान मोदींनाही वारंवार संविधान बदलणार नाही हे सांगावे लागत आहे'.

'आता नवीन मनुस्मृती आलंय. त्यामुळे आता कल्याण झालं. आम्हाला चातुवर्ण व्यवस्था मान्य नाही. पृथ्वी ही शेषनागाच्या फणावरून नसून ती श्रमिकांच्या हातावार आहे, हे शाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे. अजित पवारांना सांगणं आहे की, आमदारांची कामे ताबडतोब मंजूर करा, आचारसंहिता सुरू होण्यापू्र्वी कामाचा नारळ फुटला पाहिजे. त्याचा फायदा आमदारांना होईल, असे भुजबळ म्हणाले.

'अजित दादा, पुढील निवडणुकीत योग्य त्या जागा मिळायला पाहिजे. आता झालं ते झालं. पुढील निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळायला पाहिजे. त्यातील किमान ५० ते ६० निवडून येतील, असे भुजबळ पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cobra Rescue : सरपटत गेला अन् बियरच्या कॅनमध्ये अडकला; विषारी सापाच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Accident News : घरी परतताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

Road Accident Prediction Device: चालकाला डुलकी आली तरी नाही होणार दुर्घटना; ब्रेक लावून कारही थांबेल

Vivo V60e: जबरदस्त बॅटरी अन् दमदार फीचर्ससह Vivo V60e भारतात लाँच; किंमत किती?

अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवलं; शरीरसंबंध, VIDEO शूट अन् पैशांची मागणी, 'असं' उघडं पडलं महिलेचं पितळ

SCROLL FOR NEXT