Chhagan Bhujbal Eknath Shinde Latest News
Chhagan Bhujbal Eknath Shinde Latest News Saam TV
मुंबई/पुणे

छगन भुजबळ वेश बदलून गेले अन् तुरुंगात अडकले मागून मी पण गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला जुना किस्सा

Jagdish Patil

मुंबई: विधानसभेत आज शिंदे-भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात जोरदार भाषण केलं. या भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास कसा झाला, आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांनी आपणाला कशी साथ दिली याबद्दलच्या आठवणी देखील सांगितल्या.

याच भाषणावेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी आपण बंडखोरी करताना कसे बाहेर पडलो याचा किस्सा सांगताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि आपण एकाच जेलमध्ये कसं अडकलो होतो हे देखील सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ' राज्यसभेच्या निवडणुकीत जशी मी पक्षाला मदत केली.

मी गद्दार नाही - मुख्यमंत्री

तशीच विधान परिषदेमध्ये देखील केली. मला सगळे सहकारी म्हणाले काय करायचं, मी त्यांनी सांगितलं दोन्ही शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार निवडूण यायला पाहिजेत. नाहीतर पक्षाशी गद्दारी करुन गेले म्हणतील, असं सांगतानाच दादा मी गद्दार नाहीये, मी सेनेशी कधीही गद्दारी केली नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, माझी सरकलेली, अशातच साहेबांचा फोन आला म्हणाले, 'आपले दोन उमेदवार निवडणून आले ते पुढे चालत निघाले आहेत, असं ते म्हणाले, पण मी कुठं चाल्लोय मलाच माहित नव्हतं.' असं मुख्यमंत्री म्हणताच एकच हशा पिकला.

तसंच आम्ही निवडणुकीनंतर थेट बाहेर पडलो, फडणवीसांकडे बोट करत त्यांचे तिकडे ते आहे ना, असं म्हणताच सर्वांनी आरडोओरडा सुरु केल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'आता त्यात काय लपवायच आहे. तुमच्याकडे टॉवर लोकेशन आहे. IG नी नाकाबंदी केली. अरे पण मीही कितीतरी वर्ष काम केल आहे. नाकाबंदीमधून कसं निघायचं मला पण माहिती आहे. असं मुख्यमंत्री म्हणताच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले कसं गेलात ते पण सांगा, असं म्हणताच मुख्यमंत्री म्हणाले आता सगळं काढून घेणार का माझ्याकडून, मी खासगीमध्ये सांगेन नाहीतर तुम्ही पण तसं कराल.

आणि कर्नाटक पोलिसांनी मारलं -

भुजबळ यांनी प्रश्न विचारल्यामुळे मुख्यमंत्र्यानी आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळांचा जुना किस्सा सांगितला. मुख्यमंत्री म्हणाले, भुजबळसाहेब बेळगावला वेष बदलून गेले होते. बेळगावमध्ये यांच्या लोकांनी कर्नाटक (Karnataka) पोलिसाला मारलं, यांनी मारहाण केल्यावर मागून आमची १०० लोकांची तुकडी बेळगावमध्ये गेली.

कर्नाटक पोलिस सर्व लोकांना जंगलात सोडत होते. अशात त्यांना कोणीतरी सांगितलं हे शिवसेनेची लोकं आहेत. असं सांगितल्यावर पोलिसांना आम्हाला धरुन मारमार मारलं आणि ४० लोकांना बेल्लारी जेलमध्ये भुजबळसाहेबांमुळे टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवाय भुजबळ हे आधीच जेलमध्ये गेलेले आणि जामीन झाला होता. त्यांना रविवारी अंडी आणि नॉनव्हेज मिळायचं पण आम्ही गेल्यावर ते पण बंद केलं. त्यावेळी जवळपास आम्ही शंभर लोक चाळीस दिवस बेल्लारी जेलमध्ये अडकलो, चाळीस दिवस आमचे हाल झाले. त्यावेळी जामिनासाठी देखील कोणाकडे पैसे नव्हते पण दिघे साहेबांनी १ लाखाचा जामिन केला. त्यावेळी एक कोटी रुपये गेले.

दरम्यान, हे सर्व घडलं त्यामागे हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार होता. म्हणून आपण संगटनेसाठी अशी कामं केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आमचं हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या धर्माचा अनादर नाही करणार सन्मान करणार नाही. अबू आझमी (Abu Azmi) माझे चांगले सहकारी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.तसंच हे सरकार सर्व जातीच्या लोकांना वाटल पाहिजे हे आमचं राज्य आहे असं म्हणत त्यांनी फडणवीसांसारखे बडे तजुर्बेवाले आदमी है असं म्हणताच एकच हशा पिकला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज्यात ज्यांनी भाजप रुजवली त्या प्रमोद महाजनांची मुलगी पूनम यांना तिकिटी का दिलं नाही? ठाकरेंचा PM मोदींना सवाल

Ghatkopar Hoarding Collapsed : 'घाटकोपरचा तो अपघात नाही, तर...', होर्डिंग दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Today's Marathi News Live : ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

S Jaishankar: कोणाच्या तरी चुकीमुळे काश्मीरचा भाग गमावला; परराष्ट्रमंत्र्यांनी नेहरूंवर साधला निशाणा

Janhvi Kapoor : जान्हवीचं मनमोहक सौंदर्य; घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते क्लिन बोल्ड!

SCROLL FOR NEXT