उल्हासनगरात सिंधी समाजाची 'चेटीचंद' यात्रा SaamTVnews
मुंबई/पुणे

उल्हासनगरात सिंधी समाजाची 'चेटीचंद' यात्रा

सिंधी समाजाचा 'चेटीचंद' (Chetichand Yatra) म्हणजेच नववर्षाची सुरवात

अजय दुधाणे

~ अजय दुधाणे

उल्हासनगर : सिंधीबहुल शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगरात (Ulhasnagar) चेटीचंद यात्रा काढण्यात आली. सिंधी समाजाचा 'चेटीचंद' (Chetichand Yatra) म्हणजेच नववर्षाची सुरवात असून, या निमित्त शहरातील कॅम्प एक पासून हि यात्रा उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच पर्यंत जाते. ही यात्रा दुपारी निघते आणि रात्री समाप्ती होते. या यात्रेत विविध मुखवटे तसेच विविध चित्ररथ सामील झाले होते.

हे देखील पहा :

तसेच विविध वाजंत्री या नववर्ष स्वागत यात्रेत सामील झाले होते. चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे. सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. झुलेलाल या सांप्रदायिक देवतेचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. ही देवता म्हणजे वरुण देवता होय. जलाची देवता म्हणून तिची पूजा केली जाते. सिंधी (Sindhi) व्यापारी या दिवशी नव्या खातेवहीची पूजा करतात. सिंधी लोक या दिवशी नृत्याचा आनंद घेतात, एकत्र येऊन परस्परांना शुभेच्छा देतात.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT