डोंबिवलीनंतर 14 गावच्या नदीत झाले हिरवेगार पाणी प्रदीप भगणे
मुंबई/पुणे

डोंबिवलीनंतर 14 गावच्या नदीत झाले हिरवेगार पाणी

14 गावातील नदीमध्ये केमिकल सोडल्याचे दिसून आले आहे. या केमिकलमुळे नदीमधील पाणी हिरवेगार झाले असून पाण्यात फेस निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली :  प्रदूषित शहर म्हणून डोंबिवली शहराची ओळख असून आता हे प्रदूषणाचे लोण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधील 14 गावातही पसरल्याचे दिसून येत आहे. 14 गावात असलेल्या गोसिया मार्केटमधून आणि मुंब्रा पनवेल मार्गावरील भंगार गोदामातून केमिकल मिश्रित पाणी थेट रस्तावर सोडले गेले होते. यामुळे गावातील रस्ते निळेशार झाले होते. या घटनेनंतर तीन दिवसांतच 14 गावातील नदीमध्ये केमिकल सोडल्याचे दिसून आले. या केमिकलमुळे नदीमधील पाणी हिरवेगार झाले असून पाण्यात फेस निर्माण झाला आहे. हेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतातसुद्धा घुसले आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. (Chemicals have turned the river water green, causing damage to agriculture)

हे देखील पहा -

एमआयडीसीच्या एका कंपनीमधून नाल्यात केमिकल सोडण्यात आले. त्यामुळे गांधीनगर परिसरातून वाहणारा नाला पूर्ण हिरवगार झाला होता. आता हाच प्रकार 14 गावांतील नदीमध्ये दिसून आला. नदीत केमिकल सोडल्याने नदीचे पाणी हिरवेगार आणि फेसाळ झाले. कल्याण ग्रामीण विधनासभा क्षेत्रात 14 गावातील पिंपरी ग्रामपंचायत हद्दीतील गोदामामुळे तसेच मुंब्रा-पनवेल मार्गावरील भंगारवाल्याकडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण आणि वायूप्रदूषण होत आहे. केमिकल मिश्रित पाणी थेट रस्तावर आणि नदीत सोडले जाते. हे पाणी शेतात देखील जात आहे. आता ग्रामीण भागातही प्रदूषणाचे लोण पसरू लागले आहे. 14 गावांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदाम असल्याने याठिकाणी आग लागणे, जल प्रदूषण अशा समस्या उद्भवत असतात.

या प्रदूषणामुळे गावातील विहिरी, बोअरवेलचे पाणी प्रदूषित होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांचा संताप होत असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रदूषणबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना 10 ऑगस्टला ट्विट पण केले होते. मात्र यानंतरही प्रदूषण होतच आहे. त्यामुळे एमपीसीबी अधिकारी करतात काय हा प्रश्न उपस्थित होते आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच 'हा' ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

ZP Election Date : पुणे-सोलापूरसह १२ झेडपीचा आज धुरळा उडणार, दुपारनंतर राज्यात आचारसंहिता

Bigg Boss Marathi 6 : भांड्यांचा ढिगारा पाहून स्पर्धक चक्रावले; टास्कदरम्यान 'ही' सदस्य बेशुद्ध पडली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिकाबाहेर राडा

IndBank Recruitment 2026: परीक्षा नाही थेट सरकारी बँकेत नोकरी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT