KDMC : डोंबिवली MIDC फेज-2 मध्ये केमिकल लोचा..!
KDMC : डोंबिवली MIDC फेज-2 मध्ये केमिकल लोचा..! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

KDMC : डोंबिवली MIDC फेज-2 मध्ये केमिकल लोचा..!

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये पुन्हा एकदा केमिकल लोचा झाला आहे. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत आज फेज 2 मधील रस्त्यांवर चक्क केमिकल मिश्रित पाणी पसरले आहे. हा सर्व प्रकार डोंबिवली फेज 2 मधील टेम्पो नाका आणि सुनील डाईंग कंपनी परिसरात घडला असून रस्त्यावरील केमिकल पाण्यातून उग्र दर्प येत आहे.

हे देखील पहा :

डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. एमआयडी फेज 2 मधील एक रस्ता चक्क केमिकल मुळे गुलाबी झाला होता.तर जुलै मध्ये गांधीनगर नाला पूर्ण हिरवा झाला होता आणि आता चक्क फेज 2 मधील रस्त्यांवर चक्क केमिकल मिश्रित पाणी पसरले आहे.

हा सर्व प्रकार डोंबिवली फेज 2 मधील टेम्पो नाका आणि सुनील डाईंग कंपनी परिसरात घडला असून त्यातून उग्र दर्प येत आहे.सकाळ पासून हे केमिकल मिश्रित पाणी  रस्त्यावर आले आहे असे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी सांगितले. वारंवार अश्या घटना एमआयडी मध्ये घडत असतात.मात्र एमआयडी अधिकारी आणि एमपीसीबी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. त्यामुळे आतातरी हे अधिकारी लक्ष देणार का हे पहावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

SCROLL FOR NEXT