Mumbai Crime  Saam TV
मुंबई/पुणे

Shocking: मुंबई हादरली! निवृत्त जवानाकडून १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता २ महिन्यांची गरोदर

Mumbai Crime: मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. १५ वर्षीय मुलीवर लष्कराच्या निवृत्त जवानाने बलात्कार केला. पीडित मुलगी २ महिन्यांची गरोदर राहिली. पोटात दुखत असल्यामुळे पीडितेची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली.

Priya More

Summary:

  • मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली

  • लष्कराच्या निवृत्त जवानाचं भयंकर कृत्य

  • पीडित मुलगी २ महिन्यांची गरोदर

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लष्कराच्या निवृ्त्त जवानाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतल्या चेंबूरमध्ये घडली. पीडित मुलगी २ महिन्यांची गरोदर आहे. मुलीच्या पोटात सतत दुखत असल्यामुळे तिची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली तेव्हा ही भयंकर घटना समोर आली. या प्रकरणी मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी ५९ वर्षीय लष्कराच्या निवृत्त जवानाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत चेंबूरमध्ये राहते. ती राहत असलेल्या बिल्डिंगमध्येच हा लष्कराचा निवृ्त्त जवान देखील राहतो. या जवानाला पीडित मुलगी काका बोलते. आरोपीने पीडितेवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. ही बाब कुणाला सांगू नये यासाठी तो पीडितेला धमक्या देत होता. पण पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिच्या आईने तिला सायन रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी पीडितेची तपासणी केली असता डॉक्टरांनाही धक्का बसला. पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले.

आरोपीने १ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पीडित मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. पीडित मुलीवर त्याने हल्ला देखील केला आणि तिला गप्प राहण्यासाठी वारंवार धमकी दिली. आरोपीने धमकी दिल्यामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती त्यामुळे तिने कुणालाच याबद्दल सांगितले नाही. पण पोटात प्रचंड दुखत असल्यामुळे तिने आईला सांगितले. तिची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली त्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. हे ऐकून पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.

संतप्त झालेल्या पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली आणि पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी निवृत्त लष्कराच्या जवानाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed : ७१ विद्यार्थी, एक शिक्षक अन् चार वर्ग; भंडाऱ्यातील झेडपी शाळेत शिक्षकांची टंचाई; शाळेला ठोकलं कुलूप

Bhandara Tourism : ट्रेकिंग, ऐतिहासिक ठिकाण अन् शांत निसर्ग; सातपुडा पर्वतरांगेत वसलाय 'हा' किल्ला, पाहाल मनमोहक विहंगम दृश्य

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

Nana Patekar Video : शाहिद-तृप्तीला उशीर, नाना पाटेकर वैतागून निघून गेले; 'O Romeo'च्या ट्रेलर लाँच दरम्यान नेमकं घडलं काय?

Aloo Tikki Recipe: नाश्त्याला बनवा चटपटीत अन् क्रिस्पी आलू टिक्की; ५ मिनिटांत होईल तयार

SCROLL FOR NEXT