Chandrasekhar Bavankule Saam tv
मुंबई/पुणे

Mahavikas Aghadi: मविआमध्ये मोठी फूट पडणार? चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याने खळबळ

आता फ्लोअर टेस्ट घेतली तर आमच्याकडे १८४ आमदार असतील, असा खळबळजनक दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Prachee kulkarni

पुणे : महाविकास आघाडीत सगळं काही ठीक आहे असं वाटत नाही. महाविकास आघाडीत मोठी फूट पडणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण चंद्रशेखर यांनी तसा दावा केला आहे.

आता फ्लोअर टेस्ट घेतली तर आमच्याकडे १८४ आमदार असतील, असा खळबळजनक दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. सध्या शिंदे-फडणवीस सरकारकडे १६४ आमदारांचं संख्याबळ आहे.  (Maharashtra Political News)

मात्र चंद्रशेखर बावनकुळे सांगत असलेले अधिकचे २० आमदार कोण अशी चर्चा आता सुरु झाली आहे. फूट नको म्हणूनच विरोधकांची धावाधाव सुरु असल्याचा दावाची चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. (Mahavikas Aghadi)

जयंत पाटलांवरील कारवाई योग्यच

विरोधक गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहेत. काँगेस-राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे सगळे वेगळीकडे आहेत. विरोधकांकडे विषय नाही, त्यामुळे ते आव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जयंत पाटलांचं निलंबन नियमाला धरून झालं आहे. जर नसेल असं वाटतंय तर विरोधकांनी कोर्टात जावं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायदेतज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी जे केलं ते योग्य पद्धतीने झालं असेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

सत्तेत असताना तुम्हाला कुणी घाबरतं नव्हतं

सरकार एका 32 वर्षांच्या तरुणाला घाबरलं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं की, सरकारमध्ये होते तेव्हा तुम्हाला कोणी घाबरत नव्हतं. तेव्हा तुम्हाला न घाबरता तुमचे आमदार निघून गेले. लोकसभेमध्ये जो विषय मांडला गेला तोच विधानसभेत मांडला गेला. SIT चौकशी करण्यात येणार आहे, घाबरता कशाला? इतकं काय कर्तृत्व आहे ज्यासाठी घाबरावं.

उद्धव ठाकरे परिषदेत आलेच नाहीत. राजीनामा देणार म्हणाले होते दिला नाही. मग परिषदेत या चर्चा करा. एक दिवस आले पळून गेले. विरोधी पक्ष विषय मांडत नाही. उत्तर काय द्यायचं, असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Border 2 OTT: बॉर्डर 2 कोणत्या OTT वर पाहता येणार? लगेचच वाचा...

Shocking: मोबाइलची सवय सुटावी म्हणून मुलीला आजोळी पाठवलं, मामा अन् त्याच्या मुलानं केला बलात्कार

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुण्याहून मुंबईला येणार्‍या सर्व एसटी बसेस रद्द, २१ तासांपासून एक्सप्रेस वे ठप्प, प्रवास टाळाच, कारण...

मी जातपात मानत नाही, माळी समाजाचा उल्लेख; अजितदादांनी मृत्यूआधी कॉलवर नाव घेतलेल्या नेत्याने सगळं काही सांगितलं

SCROLL FOR NEXT