Nitesh Rane : आदित्य ठाकरेंनी शक्ती कपूरसारखं वागू नये; नितेश राणे काय म्हणाले, पाहा VIDEO

भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे.
Nitesh Rane vs Aaditya Thackeray
Nitesh Rane vs Aaditya ThackeraySaam TV

सुशांत सावंत, साम टिव्ही

Nitesh Rane vs Aaditya Thackeray : भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नितेश राणेंनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नार्को टेस्टची मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शक्तीकपूरसारखं वागू नये, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.  (Maharashtra Political News)

Nitesh Rane vs Aaditya Thackeray
Maharashtra Lockdown : राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे (Nitesh Rane) आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला ४४ कॉल करणारे AU हे आदित्य ठाकरेच आहे, असा आरोप केला होता.

इतकंच नाही तर, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुद्धा नितेश राणे यांनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. (Latest Marathi News)

Nitesh Rane vs Aaditya Thackeray
Crime News : महिला सरपंचासोबत १५ जणांचं संतापजनक कृत्य; बुलडाण्याला हादरवून टाकणारी घटना

दरम्यान, 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. घोटाळेबाज मुख्यमंत्री घाबरले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना वाचवण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहेत, म्हणून आम्हाला बोलू दिले जात नाही.

त्यांच्याकडचे चौदा लोक बोलले पण आम्हाला बोलू दिले नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. 32 वर्षीय तरुणाने 32 वर्षीय तरुणाप्रमाणे वागावं उगाच शक्ती कपूर प्रमाणे वागू नये, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? पाहा खालील व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com