माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे Saam Tv
मुंबई/पुणे

''ही तर सिनेमाची स्टोरी...जी तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघता येईल''!

पहा चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले? 

अश्विनी जाधव - केदारी, सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे: झारखंड सरकार पाडण्यामध्ये माझे नाव घेऊन केला जाणारा आरोप खूप हास्यास्पद आहे. ही तर एखाद्या सिनेमाची स्टोरी आहे. सध्या सिनेमा थिएटर सुरु नाहीत, पण ही स्टोरी नेटफ्लिक्सवर दाखवता येईल अशी टिप्पणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली आहे. पुण्यामध्ये आयोजीत युवा वॅारियर्सच्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते.

मी राज्यातील भाजपचा नेता आहे मी काही राष्ट्रीय नेता नाही तसेच झारखंडचा प्रभारीही नाही, माझ्या 51 वर्षांच्या आयुष्यात मी कधीही झारखंडला गेलो नाही, आणि झारखंडची सीमादेखील बघितलेली नाही, झारखंडच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यानेच काल याबाबत योग्य गोष्टी जाहीर केल्या आहेत,  त्यामुळे माझ्यावर आरोप करणारे  पटोले तोंडघशी पडले आहेत टोला त्यांनी नाना पटोले यांना लगावला, 

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे त्यामुळे ओबीसी समाजात प्रचंड आक्रोश आहे, डिसेंबर पर्यंत ओबीसी आरक्षणाचा डेटा तयार झाला नाही तर 2022च्या निवडणुका या ओबीसीविना होतील असा इशारा असे मत दिला आहे, 31 जुलै 2019  देवेंद्र फडणवीस सरकारने अध्यादेश काढून ओबीसींना दिलेले राजकीय आरक्षण योग्य असल्याचे सांगितले होते, मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी हा वटहुकूम रद्द केला, ओबीसी आरक्षणासाठी हे सरकार काहीही हालचाल करत नाही,आजही तीन महिन्यात डेटा तयार करुन आरक्षण मिळू शकते, पाच एजन्सीना काम देऊन मराठा आरक्षणाचा डेटा 3 महिन्यात तयार झाला मात्र ओबीसी आरक्षणाच्या डेटा तयार करण्याबाबत अद्याप  कार्यवाही झाली नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले,

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केंद्रीय नेतृत्वाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की उध्दव ठाकरेंनी जर केंद्राचं नेतृत्व केलं आम्ही त्याचे स्वागत करतो, पण त्याआधी राज्यातील सरकार  टिकवता आले पाहिजे, दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असण्याच्या मुद्द्यावर बावनकुळे म्हणाले की पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्या नाराज नाहीत , विरोधक अशा बातम्या मुद्दाम पसरवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT