शाहूपुरीत उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आमनेसामने

मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी दौऱ्यात आपत्तीग्रस्तांशी संवाद साधला
शाहूपुरीत उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस  आमनेसामने
शाहूपुरीत उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आमनेसामने Saam tv news
Published On

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy Rain) तडाखा बसला आहे. या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्वव ठाकरे (CM Udhav Thackeray) आज कोल्हापूरातील शाहुवाडीच्या (Shahuwadi) पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) देखील तिथे पोहचले. दोघांनीही काही मिनिटे एकमेकांशी चर्चा केली. (Uddhav Thackeray and Devendra Fadnavis met in Shahupuri)

शाहूपुरीत उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस  आमनेसामने
Raj kundra Pornography Case : राम कदमांचा मोठा खुलासा

मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी दौऱ्यात त्यांनी आपत्ती ग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या समस्य़ा जाणून घेतल्या. मात्र यावेळी त्याठिकाणी कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आले. यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. आपत्तीग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या चहूबाजूला गर्दी केली होती. मुख्यंमंत्र्यांनी देखील सर्वांशी चर्चा केली. तथापि या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शाहूपुरीतील स्थानिक लोकप्रतिनीधीशी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

दरम्यान, कोल्हापूर उत्तरेश्वर पेठ,शाहूपुरी, लक्ष्मीपुरी संपूर्ण पाण्याखाली गेले होते. पंचगंगा नदी अजून या भागातून दोन किलोमीटर पत्राबाहेरून वाहत आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. ठिकाठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. तर उत्तरेश्वर पेठ येथील गावकरी वाहून गेलेला आपला संसार पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

शाहूपूरीच्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही आमनेसामने आले. यावेळी दोघांमध्येही काही मिनिटे चर्चा झाली. कोल्हापूरची पूरस्थिती पाहता कोल्हापूरला तत्कलाळ भरीव मदत करण्याची विंनती य़ावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com