'नाचता येईना अंगण वाकडं' निवडणुकांच्या निकालावरुन चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोला
'नाचता येईना अंगण वाकडं' निवडणुकांच्या निकालावरुन चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोला Saam Tv
मुंबई/पुणे

'नाचता येईना अंगण वाकडं' निवडणुकांच्या निकालावरुन चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : विधानपरिषद निवडणुकीत (Nagpur Legislative Council Election) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये ऐनवेळी काँग्रेसवर (Congress) अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढावली होती. यामुळे भाजपच्या (BJP) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय निश्चित मानला जात होता. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होतील, असा शब्द देऊन काँग्रेसने शब्द न पाळण्याने निवडणुक झाली.

महाविकास आघाडीची ४० पेक्षा जास्त मतं फोडली आहेत. अकोला (Akola) विजय अविस्मरणीय आहे. काँग्रेसने या निवडणूकीत पोरखेळ केला आहे. आम्ही म्हणत होतो की सीटींग जागा सोडू आणि निवडणुक (Election) बिनविरोध करु, या निवडणुकीत तेच व्हायला पाहीजे होत. पटोले आणि सुनील केदार यांचा संघर्ष या निवडणूकीत रिफ्लेक्ट झाला आहे.

हे देखील पहा-

या निमित्ताने महाविकास आघाडीला चॅलेंज देतो की विधानसभा (Assembly) अध्यक्षाची निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने घ्या मग तुम्हाला कळेल, की मत कोणाच्या बाजुने आहे. तिकीट पक्षाचे असतं, व्होटबॅंक पक्षाची असते. म्हणून आम्हाला पक्षाने शिकवले की तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. सबुरी असेल तर त्याचे फळ मिळत असते. नाचता येईना अंगण वाकडं सत्ता सोबत ठेवायची ही या पक्षांची परंपरा आहे. स्वबळ म्हणत रहायचं आणि सपोर्ट जातो म्हणलं की भुमिका बदलायची शिवाजी महाराजांमुळे हिंदुत्वाची व्होट बॅक तयार झाले.

राज्यात हुकुमशाही सुरु आहे, त्याला आमचा विरोध आहे. भाजप या विषयायावर रस्त्यावर उतरणार आहे. हेल्मेट संदर्भातमध्ये आधी म्हणाले आम्ही आंदोलन करणार मग त्यांना विचारले असता हा निर्णय तर गडकरींचा मग म्हणाले, त्यांनाही सांगू- चूकत असेल तर सांगायची पद्धत आहे. हे अन्यायकारक आहे. हे सांगू प्रभागरचना प्रभाग नीट नसतील तर लोक आता कोर्टात जाणार आहेत. महापरीक्षा पोर्टल गेल्या २ वर्षामध्ये अनेक चौकशांची घोषणा झाली आहे. परंतु त्याची चौकशी करा. हे महाआघाडी सरकार पोस्टपोनमेंट सरकार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayank Yadav: मयांक यादवचं नशीब फळफळणार!BCCI मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं : चंद्रकांत पाटील, Video

Prasadacha Sheera : मऊ लुसलुशीत आणि गोड प्रसादाचा शिरा रेसिपी

PM Narendra Modi Rally: शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

Dubai Rain Alert : दुबईवर जलप्रलयाचं संकट! मुसळधार पावसाच्या शक्यतेने फ्लाईट्स रद्द, शाळा बंद

SCROLL FOR NEXT