Chandrakant Patil, Eknath Shinde
Chandrakant Patil, Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Chandrakant Patil: मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले: चंद्रकांत पाटील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. त्यामुळे आता भाजपमधील खदखद समोर आली आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. पण काही वेळानंतर भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवरुन डिलीट करण्यात आला आहे.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात शिंदे गट भाजप एकत्र सत्ता स्थापन केली, पण अचानक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. आता मात्र कार्यकारणी बैठकीमध्ये भाजपमधील खदखद समोर आली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हकायचा होता. सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आहेत. आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे, असंही पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

हे देखील पाहा

जेव्हापासून शपथ घेतली, तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावले जाईल आणि तेही वेळेत होईल. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचे असते, असंही पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aam Papad Recipe: उन्हाळ्यात बनवा आंबट- गोड आंब्याचे पापड; रेसिपी पाहा

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

Kolhapur Election: हळहळ! मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका, रांगेतच सोडला जीव

Gujrat News: अजब गजब... गणितात २०० पैकी २१२ अन् भाषेत २११ गुण; मुलीचं मार्कशीट व्हायरल

SCROLL FOR NEXT