पुणे: महाराष्ट्रात काल झालेल्या परिस्थितीवर भाजपच्या (BJP) विविध नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतू काल झालेल्या परिस्थितीवर भाजपचा काय मुड आहे, याबाबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज साम टिव्हीला सविस्तर मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली आहेत. अनेक मोठी विधीनं देखील केली आहेत.
शिवसेना आणि भाजपमध्ये (Shivsena-BJP) एवढी भांडणं झाली, कार्यकर्तांनी एकमेकांची गचांडी पकडली, तरीही तुम्ही शिवसेनेला मोठा भाऊ मानता? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटलांनी त्यावर मोठे विधान केले आहे. कितीही माऱ्यामाऱ्या झाल्या तरी सख्खा भाऊ हा सख्खाच असतो तो कधी सावत्र होत नाही. कितीही विरोध झाला कितीही भांडणं झाली तरीही दोघांचं रक्त एकच एकच आहे. ते म्हणजे हिंदूत्वाचं. पुढे ते म्हणाले ''आमच्यात भांडणं लावण्याचं काम हे राष्ट्रवादी आणि काँग्रसने केलं आहे आणि आता ते मजा पाहत आहेत''.
नारायण राणे यांच्या वक्तव्यावर सविस्तर बोलताना ते म्हणाले, एक वाजवून देईल ही राणेंची बोलीभाषा आहे. प्रत्येकाची बोलण्याची शैला ही वेगवेगळी असते. जशी उद्धव ठाकरेंची शैली आहेत तशीच शैली राणेंची आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलले याचा विचारही त्यांनी करावा असे पाटील म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं ज्याप्रमाणे शिवसेनेवर टीका करत होते, त्या टीकेला द्यायला उत्तर नव्हते म्हणून कालचा ड्रामा केला असल्याचं पाटील म्हणाले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.