मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष नेहमीच आपल्या शैलीत त्यांच्यावर पक्षावर झालेल्या टीकेला उत्तर देत असतात. भाजपसोबत शिवसेनेने युती करावी असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही असे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पाटलांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊतांनी कधीही कुठली निवडणुक लढवली नाही. गेले १५ ते २० दिवस राऊत बोलत आहेत, ते आहेत कोण? संजय राऊत (Sanjay Raut) यांना मी फार महत्व देत नाही. राऊत जे बोलत आहे त्याचे परिणाम त्याना निवडणुकीत दिसतील असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत.
एसटी संपावरुनही (ST Employee Strike) चंद्रकात पाटलांनी आज अजित पवार आणि अनिल परबांची भेट घेतली आहे. एसटीचा संप संपला नाही तर १ लाख जणांचे नुकसान होईल. ७ वा वेतन आयोग दिल्याने यातले काही प्रश्न सुटतील यासाठी भेट घेतली. श्रेय त्यांनी घ्यावं पण निर्णय घ्यावा असा टोमणाही पाटालांनी लगावला आहे. सकारात्मक निर्णय घेण्यासाठी अजित पवारांना विनंती केली असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. एसटी कर्मचारी विलनीकरणावर ठाम आहेत. परंतु कर्मचार्यांच्या पगारातील फरक लक्षात घेऊन तो तोडगा काढला तर कर्मचारी एखादे वेळेस माघार घेऊ शकतात असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.
मावळची जागा राष्ट्रवादीसाठी मागितली जात असल्याच्या चर्चा आहेत. यावरुन चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवरती टीका केली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद स्वत:कडे ठेवायचं आहे, मग त्यासाठी ते काहीही सोडयला तयार आहेत. जी जागा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ती जागा कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला जात आहे. दरम्यान मावळात शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्या लोकसभेसाठी लढाई झाली होती. यात श्रीरंग बारणे लाखो मतांनी निवडून आले होते.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.