chandani chowk flyover open for today dcm devendra fadnavis Speech Nitin Gadkari Pune Traffic solution Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis News: पुण्यात डबलडेकर पूल उभारून वाहतूक कोंडी सोडवणार; फडणवीसांनी सांगितला गडकरींचा पुढचा प्लान

Devendra Fadnavis Latest News: पुण्यातील सगळी कोंडी दूर करण्यासाठी डबलडेकर प्लाय ओव्हर तयार करण्याचा नितीन गडकरी यांचा प्लान आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Satish Daud

Devendra Fadnavis Latest News: पुण्याच्या चौहीबाजूंनी वेगवेगळ्या शहरांकडे जाणारे रस्ते आणि त्या रस्त्यांची कोंडी, यामुळेच पुण्याची वाहतूक कोंडी वाढते. सोलापूरहून पुण्याला येण्यासाठी दोन अडीज तास लागतात. पण पुण्याच्या जवळ आलं की, वाहतूक कोंडीमुळे तेवढाच वेळ शहरात येण्यासाठी लागतो. अशी सगळी कोंडी दूर करण्यासाठी डबलडेकर प्लाय ओव्हर तयार करण्याचा नितीन गडकरी यांचा प्लान आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फक्त डबलडेकर प्लाय ओव्हर नाही, तर एलिव्हेटेड रस्ते तयार करून त्या रस्त्याच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवायची अशा प्रकारचा अतिशय महत्वाचा प्लान नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. राज्य सरकारच्या वतीने आम्ही देखील त्यांना आश्वासन देतो, की हा प्लान आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, जेणेकरून येत्या काळामध्ये वाहतुकीची कोंडी नसलेलं शहर म्हणून पुणे शहराची ओळख निर्माण करता येईल, असं देखील फडणवीसांनी सांगितलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराला कसं वाहतूक कोंडीपासून मुक्त करता येईल, याबाबत नितीन गडकरी यांनी आखलेला प्लान सांगितला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुंबईमध्ये आम्ही मेट्रो 2 A लाईन सुरू केली. त्या कॉरिडॉर खालचा जवळपास 2 लाख वाहनांचा ट्रफिक आम्ही संपवू शकलो. मुंबईतील बरीच वाहतूक कोंडी आम्ही सोडवू शकलो. तशीच वाहतूक कोंडी आम्ही पुण्यातही सोडवणार आहोत"

पुणे हे विचारवंतांचे शहर आहे. इथे निर्णय घेणे सोपे नाही. एखाद्या प्रकल्पासाठी लोक तीन वेगवेगळ्या देशातील संस्थांचे रिपोर्ट आणतात. पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोपेक्षा आधी सुरु झाले होते. मात्र, नागपूर मेट्रोचे काम आधी पूर्ण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान,गडकरी साहेबांचे पुण्यावर असलेल्या प्रेमामुळं वेगवेगळे प्रकल्प होत आहेत, याचा आनंद असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, यासाठी कळव्यात आगरी-कोळी बांधवांचा कॅण्डल मार्च..

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

SCROLL FOR NEXT