Mumbai-Pune Maharashtra Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Rain Alert : मुंबई-पुण्यासाठी पुढील 3-4 तास महत्वाचे; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain Updates : येत्या ३-४ तासांत मुंबईसह पुण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Satish Daud

मुंबईसह पुण्यात आज शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. येत्या ३-४ तासांत मुंबईसह पुण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD Rain Alert) आज मुंबईसह, पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहेत. ठाणे, भिवंडी, पालघर तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवी मुंबईतही सध्या मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत.

दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, वाशी आणि नेरुळ विभागात जोरदार पाऊस पडत आहे.मागील अनेक दिवसांपासून नवी मुंबईकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. आता पावसाने जोर धरला असून यामुळे नवी मुंबईकर सुखावले आहेत.

दुसरीकडे ठाणे आणि भिवंडी परिसरातही सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain News) भिवंडी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे .

भिवंडी शहरातील तीन बत्ती ,भाजी मार्केट, बाजारपेठ ,कल्याण नाका, पटेल नगर,कमला हॉटेल परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तीन बत्ती,भाजी मार्केट परिसरात दोन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.

अनेकजण पाण्यामधून घरी जाण्यासाठी वाट काढत आहेत. तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी (Heavy Rain) साचल्यामुळे अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून वाहतूक देखील मंदावली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे.

कोकणातही पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. आज सकाळपासून सर्वच तालुक्यात पाऊस दमदार पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये देखील चांगला पाणीसाठा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार भरपूर नफा

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

SCROLL FOR NEXT