Villagers in Indapur report sighting of suspected wolf-dog hybrid puppies amid rising fear after Chakan dog attack. Saam tv
मुंबई/पुणे

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

Chakan Dog Attack Wolf Dog Hybrid Truth: चाकणमध्ये कुत्र्यांनी महिलेचा बळी घेतल्यानंतर भटके कुत्रे इतके हिंस्त्रं कसे झालेत? या मुद्यावर चर्चा सुरु झाली. लांडगा आणि कुत्र्याच्या मिलनातून जन्मलेले हे कुत्रे असल्याचा दावा करण्यात येतोय. हे खरं आहे का? वन विभागाने यावर काय भूमिका घेतलीये ? पाहूया साम टीव्हीचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट...

Girish Nikam

हा व्हिडीओ नीट पाहा...भटक्या कुत्र्यांनी चाकणमध्ये अक्षरशः लचके तोडून महिलेचा बळी घेतला... त्यानंतर भटके कुत्रे इतके हिंस्त्रं कसे झालेत? यावर चर्चा सुरु असतानाच लांडगा आणि कुत्र्याच्या मिलनातून जन्मलेली हेच ते हिंस्त्रं कुत्रे आहेत, असा दावा करण्यात येतोय... याच दाव्यामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय... कारण इंदापूरच्या कडबनवाडीत लांडगा आणि कुत्र्याच्या मिलनातून 4 पिलांचा जन्म झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय...

महत्त्वाचं म्हणजे ही पिल्ले हुबेहुब कुत्र्याच्या पिल्लांसारखी दिसतात. त्यांचा सांभाळ दोन प्रौढ लांडग्यांकडून केला जातोय... ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर साम टीव्हीनं थेट इंदापूरची कडबनवाडी गाठली.... आणि चक्कं कुत्रा आणि लांडग्यापासून जन्मलेली 4 पिलं दिसून आले...

यानंतर साम टीव्हीनं कडबनवाडीच्या ग्रामस्थांशी संवाद साधला.. यावेळी हिंस्त्र कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल नागरीकांनी संताप व्यक्त केलाय. एवढंच नाही कुत्रा आणि लांडग्याच्या संकराकडे वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय...

स्थानिक नागरिक

स्थानिकांच्या आरोपांनंतर साम टीव्हीनं थेट वन विभागाचं कार्यालय गाठलं... यावेळी वन विभागानंही लांडगा आणि कुत्र्याच्या संकरामुळे लांडग्यांच्या जनुकीय साखळीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली.. मात्र वनविभाग कुत्रा आणि लांडग्यांचा संकर रोखण्यासाठी उपाययोजना करत असल्याचंही वनविभागानं स्पष्ट केलंय..

दी ग्रासलॅण्ड ट्रस्टने2023 पासून लांडगा आणि भटक्या कुत्र्यांमधील संकराच्या पाच घटनांची नोंद केली आहे.कडबनवाडीतील प्रकरणामध्ये मादीने माजावर असताना कुत्र्यासोबत मिलन केले. ज्यामधून कुत्र्यासारखा दिसणारा पिल्लांचा जन्म झाला. अशी पिल्ले जनुकीय साखळीला धोकादायक ठरणार असल्याचं अशा पिल्लांचे वेळीच नियोजन करण्यासाठी एक प्रमाणभूत कार्यपद्धती म्हणजेत एसओपीची गरज असल्याचं ट्रस्टचं म्हणणं आहे. पुणे वन विभाग या पिल्लांच्या नियोजनाबाबत 'भारतीय वन्यजीव संस्थान'सोबत चर्चा करणार आहे.

केवळ कडबनवाडीतील हा प्रश्न नाही. वन्यजीव साखळीला पोचणारा धोका आणि मानवी वस्तीत कुत्र्याच्या अशा संकरीत जातीचा वावर वाढल्यास ते मोठं संकट ठरणार आहे. कारण आधीच बिबट्याच्या हल्लांमुळे नागरिक दहशतीत आहेत. आता लांडगा-कुत्र्याच्या संकरातून हिस्त्र पिल्लांचा जन्म झाला तर तो लांडग्यांच्या जैविक साखळीतच नाही तर माणसासाठीही मोठा धोका ठरू शकतो...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT