Kharghar Chain Snatching Video  saam tv
मुंबई/पुणे

Chain Snatching Video : चोरट्याने महिलेच्या गळ्यातून अशी ओढली सोनसाखळी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Chain Snatching : एकाने महिलेच्या गळ्यातील साखळी ओढली आणि दुसऱ्याने बाईक सुरु करून ठेवली.

Chandrakant Jagtap

>> सिद्धेश म्हात्रे

Kharghar Chain Snatching Video : खारघरमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमधील विहार गेटजवळ सेक्टर चारमध्ये ही घटना घडली. याठिकाणी बाईकवरून आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील साखळी ओढली आणि दुसऱ्याने बाईक सुरु करून ठेवली होती. साखळी चोरल्यानंतर दोघेही दुचाकीवरून निघून गेले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता भर रस्त्यात दोन महिला बोलत असताना एक जण तिथे दबा धरून बसतो आणि दुसरा बाईक सुरु करून ठेवतो. त्यानंतर पहिला महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून गाडीवर बसतो आणि दोघे तेथून पसार होतात.

चोरट्यांनी चोरलेली साखळी जवळपास पावणे दोन तोळ्याची होती. या चोरीप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT