मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

Meenatai Thackeray Statue: स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या दादरच्या शिवाजी पार्कातल्या पुतळ्यावर रंग फेकण्य़ात आला. त्यामुळे मोठी खळबळ माजली. हा महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. नेमकं काय घडलं? आणि उद्धव ठाकरेंनी असा आरोप का केला ? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Meenatai Thackeray Statue:
Defaced statue of Meenatai Thackeray at Shivaji Park, Dadar, after color was thrown on it.saam tv
Published On
Summary
  • दादरच्या शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी रंगफेक केली.

  • या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.

  • उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराला महाराष्ट्र पेटवण्याचा कटकारस्थान म्हटले.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत एका मागून एक वाद उफाळून येत आहेत. आधी हिंदीसक्तीवरून वाद. त्यानंतर मग कबुतरखान्यांवरून संघर्ष पेटला. हे कमी होतं की काय आता शिवाजी पार्कातील स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यावरून वाद उफाळून आलाय. यामुळे ठाकरेसेना चांगलीच आक्रमक झालीय. उद्धव ठाकरेंनी तर थेट हा महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असल्याचा मोठा आरोप केलाय.

मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही पुतळ्याची पाहणी करत, पोलिसांना परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे आरोपीला 24 तासांत शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकावर लवकरच कारवाई करणार असल्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलंय.

शिवाजी पार्कसारख्या रात्री १२ वाजेनंतरही रेलचेल असलेल्या परिसरात आणि आजूबाजूला सीसीटीव्ही असताना मिनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलाय. या घटनेमागे नेमका काय हेतू आहे? हा एखाद्या माथेफिरूचा खोडसाळपणा आहे की खरंच मुंबईत वाद पेटवण्याचा हेतू आहे हे पोलिसांनी शोधून काढणं गरजेचं आहे....कारण पालिका निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार आणखी घडण्याची शक्यता नाकरता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com