बापरे! कोरोना RT-PCR टेस्टचे सर्टिफिकेट लॅबमधून नव्हे; सायबर कॅफेतून SaamTV
मुंबई/पुणे

बापरे! कोरोना RT-PCR टेस्टचे सर्टिफिकेट लॅबमधून नव्हे; सायबर कॅफेतून

पोलिसांनी बोगस ग्राहक बनून सायबर कॅफे चालविणाऱ्या शरीफ खान याच्याशी संपर्क केला. कोणतेही स्वॅब न घेता शरीफ याने लाईफनिती वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड या पॅथोलॉजी लॅबच्या नावाचा अहवाल दिला.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी हा विषाणू अद्याप नष्ट झालेला नाही. त्यामुळे प्रवासासाठी तसेच अनेक ठिकाणी प्रवेशासाठी आरटीपीसीआरRT-PCR Test चाचणी बंधनकारक आहे. भेंडीबाजारातून Bhendibajar आरटीपीसीआर चाचणीचे बोगसDuplicate निगेटिव्ह अहवाल देणाऱ्या मोहम्मद शरीफ जमीरुल्ला खानMohammad Sharif Jamirullah Khan (३७) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शरीफ हा या परिसरात सायबर कॅफे चालवितो. Certificate of Corona test not from lab, From a cyber cafe

हे देखील पहा-

मुंबईतील रुग्णालये तसेच खासगी लॅबमध्ये Private Labआरटीपीसीआर चाचणीसाठी अधिक रक्कम आकारली जात असल्याने लोकांकडून स्वस्तामध्ये अहवाल देणाऱ्या लॅबचा शोध सुरु असतो. अशातच भेंडीबाजार परिसरातील 'अझारी नेट कॅफे' येथून स्वस्तामध्ये निगेटिव्ह अहवाल तयार करून दिला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी पोलिस निरीक्षक पंढरीनाथ पाटीलPandharinath Patil यांना मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक बनून सायबर कॅफेCybercafe चालविणाऱ्या शरीफ खान याच्याशी संपर्क केला. कोणतेही स्वॅब न घेता शरीफ याने लाईफनिती वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड या पॅथोलॉजी लॅबच्याWellness International Limited Pathology नावाचा अहवाल दिला.

दरम्यान युनिट १ चे निरीक्षक शिंदे, सहायक निरीक्षक गावडे, उपनिरीक्षक तावडे, महाजन यांच्या पथकाने सायबर कॅफेमध्ये छापा टाकला. बोगस निगेटिव्ह अहवाल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी सायबर कॅफेमधून हस्तगत केले. पोलिसांनी शरीफ याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी जे. जे. मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

सातशे रुपयांत अहवाल

शरीफ बनावट आरटीपीसीआर अहवाल बनवून देण्यासाठी ग्राहकांकडून सहाशे तसे सातशे रुपये घेत होता. वेगेगळ्या लॅबच्या नावाने कॉम्पुटरवरती निगेटिव्ह असल्याचे अहवाल तयार करून त्याचे प्रिंटआउट ग्राहकांना दिले जात होते. अशाप्रकारे त्याने अनेकांना अहवाल विकल्याचा प्राथमिक अंदाज असून सायबर कॅफेमधील संगणक, मोबाइल तसेच इतर साहित्याच्या पडताळणीमधून त्याने नेमके किती जणांना अहवाल दिले हे लवकरच स्पष्ट होईल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

SCROLL FOR NEXT