Mumbai Local  saam tv
मुंबई/पुणे

Local Accident: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या, कारण काय?

Central Railway Services Disrupted: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. खोपोलीजवळ लोकलने बैलाला धडक दिली. बैल लोकलखाली अडकल्यामुळे लोकल एकाच ठिकाणी एका तासापासून उभी आहे.

Priya More

Summary:

  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • खोपोलीजवळ लोकलने बैलाला धडक दिली

  • लोकलखाली बैल अडकल्याने वाहतूक ठप्प

  • मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. खोलोपीजवळ रेल्वेने बैलाला धडक दिली. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. मुंबईकडे येणारी लोकलसेवा उशिराने सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीमध्ये रेल्वेने बैलाला उडवल्याने मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सहा वाजून दोन मिनिटांनी खोपोलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेल्या लोकलला अपघात झाला. खोपोलीनंतर येणाऱ्या केळवली - पळसदरी या रेल्वे स्थानकादरम्यान लोकलने बैलाला धडक दिली. त्यामुळे लोकल थांबली आहे. ही लोकल आणि त्यामागे आणि पुढे असणाऱ्या लोकल देखीेल खोळंबल्या आहेत.

धावत्या लोकलने बैलाल धडक दिली. त्यानंतर हा बैल लोकलखाली अडकला. त्यामुळे तासाभरापासून लोकल एकाच ठिकाणी थांबून आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बैलाला बाजूला काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच रेल्वे वाहतूक सुरळीत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

SCROLL FOR NEXT