CENTRAL RAILWAY TO RUN 54 15-COACH LOCALS; MAJOR RELIEF FOR MUMBAI COMMUTERS saam tv
मुंबई/पुणे

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दीत धावणार १५ डब्यांच्या लोकल, कर्जत-खोपोली, कसारा, बदलापूरच्या प्रवाशांना दिलासा

Mumbai Local Update: मध्य रेल्वेने १५ ऑगस्टपासून १२ डब्यांच्या आणखी २२ लोकल १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकलची संख्या ५४ होणार असून कर्जत, खोपोली, बदलापूर आणि अंबरनाथच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Bharat Jadhav

  • मध्य रेल्वेने १५ ऑगस्टपासून आणखी २२ लोकल १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • १५ डब्यांच्या लोकलची संख्या ३२ वरून ५४ होणार आहे.

  • प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने १५ ऑगस्टपासून १२ डब्यांच्या आणखी २२ लोकल १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर १५ डब्यांच्या लोकलची संख्या ३२ वरून ५४ होणार आहे. या बदलामुळे या प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे.

सीएसएमटी-कर्जत/खोपोली मार्गावर या २२ लोकल धावतील. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोलीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणारय. या सेवांमध्ये सकाळच्या गर्दीच्या वेळेतील अंबरनाथ-सीएसएमटी आणि खोपोली-कर्जत या दोन लोकल, तर सायंकाळीच्या गर्दीच्या वेळेतील सीएसएमटी-अंबरनाथ आणि सीएसएमटी-कर्जत या दोन लोकलचा समावेश असणार आहे.

आधी २० जुलैला १५ डब्यांच्या लोकलची संख्या ३२ झाली होती. त्यावेळी १२ डब्यांच्या १० सेवांचे १५ डब्यांमध्ये रूपांतर करण्यात आले होतं. आता आणखी २२ सेवांचे रूपांतर केल्याने ही संख्या ५४ वर पोचलीय. मात्र लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या १,८२० इतकीच राहील.

काही लोकलसेवांच्या वेळेत बदल

१५ डब्यांच्या लोकल सुरू करताना काही सेवांमध्ये बदल करण्यात आलेत. खोपोली-परळ लोकल आता खोपोली-दादर लोकल म्हणून पहाटे ४:५० वाजता सुटेल. तसेच परळ-खोपोली लोकलऐवजी दादर-खोपोली लोकल सकाळी ७:४३ वाजता सुटेल. सीएसएमटी-खोपोली आणि सीएसएमटी-अंबरनाथ या दोन लोकल धीम्याऐवजी जलद करण्यात आल्यात. तर दर शनिवारी देखभालीसाठी दादर-अंबरनाथ १५ डब्यांची सेवा रद्द राहील असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 रुपयात अनलिमिटेड कॉल, रोज १ जीबी डेटा, १०० SMS; पण ही एक अट...BSNL ची जबरदस्त ऑफर

फार्म हाऊसवर सुरू होता भयंकर प्रकार; पोलिसांची धाड पडताच पळापळ, ८ महिलांसह २२ जणांना अटक

शिपायापासून ACP पदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास! अशोक होनमाने यांना केंद्र सरकारचा मानाचा सन्मान

Maharashtra News Live Update: खुलताबादमध्ये वाहतूक कोंडी; आमदार प्रशांत बंब रस्त्यावर उतरले

Skincare Tips : स्विमिंग करण्यापूर्वी 'या' २ गोष्टी चेहऱ्याला लावा; नाहीतर काही मिनिटांत बदलेल तुमचं रुपडं...

SCROLL FOR NEXT