Mega Block
Mega Block Saam tv
मुंबई/पुणे

Mega block Update: अंबरनाथ- कर्जत दरम्यान उद्या मेगाब्लॉक, वाचा सविस्तर माहिती

अजय दुधाणे

अंबरनाथ : मध्य रेल्वेच्या (central railway) अंबरनाथ ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान उद्या रेल्वेचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात (Mega block) पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं सकाळी १०.५० ते दुपारी १.१० या वेळेत अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातील कर्जत दिशेचा पादचारी पूल धोकादायक झाल्यामुळं काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यामुळं प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना संपूर्ण रेल्वे स्थानकाला वळसा घालून स्कायवॉकने पूर्व-पश्चिमेचा प्रवास करावा लागत होता. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या पादचारी पुलाच्या बाजूला आता नवीन पादचारी पूल उभारण्याचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलंय. या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचं काम उद्या रविवारी करण्यात येणार आहे. यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकातून होणारी दोन्ही दिशेची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे.

अंबरनाथ ते कर्जत या सेक्शनमध्ये सकाळी १०.५० ते दुपारी १.१० या वेळेत संपूर्ण रेल्वेसेवा बंद ठेवली जाणार आहे. या काळात मुंबईकडे येणाऱ्या हैद्राबाद सीएसएमटी एक्स्प्रेस आणि कोइंबतूर एलटीटी एक्स्प्रेस या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जत पनवेल दिवा या मार्गानं वळवून पुढे मुंबईकडे नेल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलाय. दिव्याचा प्लॅटफॉर्म लहान असल्यानं या गाड्या २ वेळा थांबवल्या जातील,अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.

Edited By - Naresh shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni- Daryl Mitchell: डॅरील मिचेलने धावत २ धावा पूर्ण केल्या, पण धोनीने स्ट्राईक सोडली नाही - Video

Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

Today's Marathi News Live : नाराज आबा बागुल काँग्रेस रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात

SCROLL FOR NEXT