Mumbai Local Mega Block Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Central Railway Mega Block: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक असणार आहे. बदलापूर येथे स्थानक विस्तारासाठी काम सुरु आहे. यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Siddhi Hande

आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

बदलापूर स्थानकाच्या विस्तारासाठी काम सुरु

यामुळे ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या काही कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमचे बाहेर काही काम असेल तर त्याआधी वेळापत्रक बघून जा.

बदलापूर स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी पादचारी पूल हटवणे तसेच प्रस्तावित कल्याण–बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका प्रकल्पाच्या गर्डर्स लाँचिंगच्या कामासाठी १० आणि ११ जानेवारी म्हणजेच आज आणि उद्याविशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक परिचलीत करण्यात येत आहे

मध्य रेल्वे, मुंबई विभागातर्फे बदलापूर स्थानकावर १५ डब्यांच्या उपनगरी गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या विस्ताराच्या कामासाठी पादचारी पूल हटवणे. चिखलोली येथे पादचारी पुल क्र. १ व २ साठी गर्डर्स लाँचिंगचे काम करण्यासाठी आणि कल्याण –बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका प्रकल्पाच्या अनुषंगाने करण्यात येत आहे.

ब्लॉकची तारीख आणि वेळ

ब्लॉक (शनिवार– रविवार मध्यरात्री) रोजी ००.०० ते ०५.०० वाजेपर्यंत अंबरनाथ ते वांगणी दरम्यान अप व डाउन मार्गावर.

ब्लॉक (शनिवार–रविवार मध्यरात्री) रोजी ०१.३० ते ०४.०० वाजेपर्यंत अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान अप व डाउन मार्गावर.

ब्लॉक (शनिवार– रविवार मध्यरात्री) रोजी ०२.०० ते ०३.०० वाजेपर्यंत कल्याण ते अंबरनाथ दरम्यान अप व डाउन मार्गावर.

ब्लॉक–३: ११/१२.०१.२०२६ (रविवार– सोमवार मध्यरात्री) रोजी ०१.४५ ते ०३.१५ वाजेपर्यंत अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान अप व डाउन मार्गावर.

ब्लॉकमुळे होणारे परिणाम

अप मेल / एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

खालील गाड्या कर्जत – पनवेल– दिवा मार्गे वळविण्यात येतील व त्या त्यांच्या गंतव्य स्थानकावर सुमारे १० ते २० मिनिटे उशिरा पोहोचतील.

गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १०/११.०१.२०२६ (शनिवार– रविवार रात्री) आणि ११/१२.०१.२०२६ (रविवार–सोमवार रात्री)

गाडी क्रमांक 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस १०/११.०१.२०२६ (शनिवार–रविवार रात्री)

गाडी क्रमांक 11140 होस्पेटे– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस १०/११.०१.२०२६ (शनिवार –रविवार रात्री)

ब्लॉक कालावधीत रेल्वे सेवा

ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि वांगणी स्थानकांदरम्यान उपनगरी रेल्वे सेवा सुरु राहणार आहेत.

बीएल 61 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– बदलापूर लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटते ती लोकल रद्द असणार आहे.

टीबीएल–4 बदलापूर–ठाणे लोकल जी बदलापूर येथून २३.०४ वाजता सुटते, ती फक्त रद्द असणार आहे.

एस–1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– कर्जत लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटते, ती अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

एस–2 कर्जत–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कर्जत येथून ०२.३० वाजता सुटते, ती अंबरनाथ येथून ०३.१० वाजता शॉर्ट ओरिजिनेट होईल.

शेवटच्या व पहिल्या उपनगरी गाड्या

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– कर्जत लोकल असून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.३० वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल असून ती बदलापूर येथून २३.२९ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल ठाणे– कर्जत लोकल असून ती ठाणे येथून ०५.०० वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल असून ती कर्जत येथून ०३.३५ वाजता सुटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: महागडी पार्लर ट्रिटमेंट कशाला? घरच्या घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक लावा, मिळेल हेल्दी ग्लॉईंग स्किन

Saree : आवडत्या साड्या जुन्या झाल्यात? मग 'असा' करा वापर, पारंपरिक लूकला येईल मॉर्डन टच

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

SCROLL FOR NEXT