Passengers wait at a Mumbai local railway station as Central Railway announces a mega block affecting services on Sunday. Saam Tv
मुंबई/पुणे

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेच्या वाहतूक वेळेत बदल; या मार्गांवर असणार मेगा ब्लॉक

Mumbai Local Train Mega Block Sunday Update: मध्य रेल्वेवर रविवारी, ११ जानेवारी २०२६ रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मुख्य मार्गावरील धीम्या सेवा आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहणार आहेत.

Omkar Sonawane

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकचा परिणाम मुख्य मार्गावरील धीम्या मार्गाच्या सेवा तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावरील रेल्वे सेवांवर होणार आहे.

मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल.या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.४८ ते ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.

तसेच घाटकोपरहून १०.१९ ते ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द

ठाणे ते वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यानची सर्व रेल्वे सेवा पूर्णतः रद्द राहणार आहे. ठाणे येथून १०.३५ ते ४.०७ दरम्यान वाशी, नेरूळ व पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या, तसेच पनवेल, नेरूळ आणि वाशी येथून १०.२५ ते ४.०९ दरम्यान ठाणेकडे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाची माहिती

पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा मेगा ब्लॉक अत्यावश्यक असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे. ही माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT