Karjat to Khopoli Railway : Saam Tv
मुंबई/पुणे

Central Railway : कर्जत ते खोपोलीचा प्रवास होणार वेगवान; ९० किमी प्रतितासच्या गतीने धावणार रेल्वे

Karjat to Khopoli Railway : कर्जत ते खोपोलीमध्ये धावणाऱ्या उपनगरीय सेवांचा वेग सध्या ६० किमी प्रतितास आहे. हा वेग वाढवण्यात येणार असून मध्य रेल्वे या मार्गावर ९० किमीच्या गतीने आपला प्रवास करणार आहे.

Bharat Jadhav

(सुरज सावंत)

Karjat to Khopoli Central Railway Line :

कर्जत आणि खपोलीच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही शहरातील प्रवास जलद होणार असून या दोन्ही शहरातील रेल्वे आता सुस्साट वेगाने धावणार आहेत. या मार्गावरील रेल्वेची गती वाढवण्यासाठी या भागात ६ दिवासांचा ब्लॉक घेण्यात आलाय. हा ब्लॉक २३ ते २४ शनिवार/रविवार मध्यरात्री ते २८ ते २९ डिसेंबर गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री पर्यंत असेल.(Latest News)

कर्जत ते खोपोलीमध्ये धावणाऱ्या उपनगरीय सेवांचा वेग सध्या ६० किमी प्रतितास आहे. हा वेग वाढवण्यात येणार असून मध्य रेल्वे या मार्गावर ९० किमीच्या गतीने आपला प्रवास करणार आहे. मार्गिकावरील रेल्वेची गती वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामासाठी ६ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परंतु हा ब्लॉक सलग सहा दिवस नसणार आहे. दोन टप्प्यात हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. खोपोली-कर्जत-खोपोलीहून ००.०३ वाजता सुटणारी आणि ००.५५ वाजता कर्जत येथे पोहोचणारी लोकल ब्लॉकच्या सर्व ६ दिवसांसाठी रद्द राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- खोपोली २३.१८ वाजता सुटणारी लोकल ब्लॉकच्या ६ दिवसांसाठी कर्जत येथे थांबेल. खोपोलीसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.२८ वाजता सुटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

SCROLL FOR NEXT