New Mobile UTS Assistant Service Helps Passengers Saam
मुंबई/पुणे

प्रवाशांसाठी खूशखबर! तिकीटासाठी रांगेत उभं राहण्याचं टेन्शनच संपलं, मध्य रेल्वेने केली खास सोय

New Mobile UTS Assistant Service Helps Passengers: मध्य रेल्वेने ‘मोबाइल यूटीएस सहाय्यक’ ही नवी सुविधा सुरू केली आहे. हे सहाय्यक प्रवाशांना लगेच तिकीट काढून देतात.

Bhagyashree Kamble

  • मध्य रेल्वेने ‘मोबाइल यूटीएस सहाय्यक’ ही नवी सुविधा सुरू केलीये

  • यामुळे प्रवाशांना बराच फायदा होतो

  • तसेच प्रवाशांच्या वेळेची बचत होते

मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन. मुंबईत फिरायचं म्हटलं तर सामान्य प्रवासी लोकलनेच प्रवास करतात. लोकल ट्रेनने प्रवास करण्याआधी तिकीट काढणं अनिवार्य आहे. जसं जसा काळ बदलत गेला, तस तसं तिकीट काढण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदलाव येत गेला. मात्र, अजूनही असेही काही प्रवासी आहेत, जे रांगेत उभे राहून तिकीट काढतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने एक नवीन सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आता आपण 'एम-यूटीएस सहाय्यक' यांच्या मदतीने तिकीट काढू शकता.

प्रवाशांसाठी नेमकी नवी सुविधा कोणती?

लोकल पकडण्याची प्रत्येकाला घाई असते. त्यामुळे रांगेत उभं राहून तिकीट काढताना बराच वेळ जातो. यासाठी लोकल ट्रेनचे तिकीट काढणे आणखी सोपे व्हावे, यासाठी एटीव्हीएम, यूटीएस प्रणाली आणि यूटीएस सेवेनंतर आता 'मोबाईल यूटीएस सहाय्यक' ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३१ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.

याचा फायदा प्रवाशांना नेमका कसा होणार?

'मोबाईल यूटीएस सहाय्यक' या नव्या सुविधेमुळे १३ दिवसांत तब्बल २०.३३ लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी तिथे विशेष प्रशिक्षित अशी ३ 'मोबाईल यूटीएस सहाय्यक' व्यक्ती तिकीट प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. हे सहाय्यक प्रवाशांकडून तिकीटाची माहिती आणि पैसे घेतात. तसेच तिकीट प्रिंट करून देतात. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होते.

मोबाईल यूटीएस सहाय्यक कसे काम करते?

'मोबाईल यूटीएस सहाय्यक' सोबत मोबाईल फोन आणि लहान तिकीट प्रिंटिंद मशीन घेऊन असतात. उभ्या असलेल्या प्रवाशांकडे ते थेट जातात. त्यांना त्वरीत तिकीट काढून देतात. डिजिटल पेमेंट किंवा रोख रक्कम देऊन तिकीट काढण्याची सुविधा आहे. यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे-शहांची भेट होऊनही राजकीय लढाई सुरु, २४ तासांत शिवसेनेनं भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार फोडला

Mumbai : प्रवाशांसाठी खुशखबर! 'मेट्रो ९' मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार, कुठून कुठे धावणार?

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई

कुत्रा मागे लागला अन् घाबरून पळाला, तिसऱ्या मजल्यावरून पडला; पुण्यातील इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

Dehydration Symptoms: शरीरात पाण्याची कमतरतेमुळे होतील हे नुकसान, आजपासूनच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT