Central Railway collected a fine of Rs 18 crore from 3 lakh ticketless passengers Saam TV
मुंबई/पुणे

Central Railway News: मध्य रेल्वेचा 3 लाख फुकट्या प्रवाशांना दणका; तब्बल १८ कोटींचा दंड केला वसूल

Central Railway Ticket Penalty: तिकीट न काढता फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेने दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.

Satish Daud

Central Railway Ticket Penalty

बेशिस्त प्रवाशांना वळणीवर आणण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. तिकीट न काढता फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेने दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ५ महिन्यात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अधिकाऱ्यांच्या हाती ३ लाख प्रवासी लागले आहेत. या प्रवाशांकडून अधिकाऱ्यांनी तब्बल १८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. (Latest Marathi News)

या दंडाच्या रक्कमेमुळे मध्य रेल्वेला (Central Railway) मोठा फायदा झाला असून फुकट्या प्रवाशांना वचक बसला आहे. मागील काही दिवसांपासून कुठलेही तिकीट न काढता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

तिकिट खिडक्यांवरील रांगेत उभे राहण्याचा कंटाळा, तसेच वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विनातिकीट प्रवास करीत आहेत. ज्या श्रेणीचे तिकीट घेतले, त्याच श्रेणीतून प्रवास करा. विनातिकीट प्रवास करू नका, अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे रेल्वेकडून वारंवार सांगितले जाते.

मात्र, जनरलचे तिकीट काढून अनेकजण उच्च श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतात. मुंबई लोकल ट्रेननमध्ये थर्ड क्लासचे तिकीट काढून अनेकजण फस्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची विशेष मोहिम राबवण्यास सुरुवात केली.

गेल्या ५ महिन्याच्या या मोहिमेत अधिकाऱ्यांच्या हाती ३ लाख प्रवासी लागले आहेत. या प्रवाशांकडून अधिकाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत दंडाची तब्बल १८ कोटी रुपये इतकी रक्कम जमा झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. रेल्वेच्या या मोहिमेमुळे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT