Mumbai Local  Saam Tv
मुंबई/पुणे

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, लोकलच्या गर्दीला लागणार ब्रेक; मध्य रेल्वेचा नेमका प्लान काय?

12-Coach Locals to Become 15-Coach Soon: सीएसएमटी ते कल्याणदरम्यान सध्या १५ डब्यांच्या लोकल गाड्या धावत आहे. तर इतर १२ डब्यांच्या लोकल आहेत. लवकरच कल्याणच्या पुढे कर्जत - कसारा येथेही १५ डब्यांच्या लोकल धावतील.

Bhagyashree Kamble

  • लोकल गर्दीला ब्रेक!

  • कर्जत–कसारा प्रवाशांसाठी खुशखबर

  • लवकरच १५ डब्यांच्या लोकल धावणार

प्रवाशांची लाईफलाइन म्हणजे लोकल. याच लाईफलाइनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. कर्जत कसारा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्जत आणि कसारा स्थानकांदरम्यान, १५ डब्यांचा लोकल गाड्या चालवण्यासाठी तब्बल २७ रेल्वे स्थानकांचे विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ही कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सध्या सीएसएमटी ते कल्याणदरम्यान, १५ डब्यांच्या लोकल गाड्या धावत आहेत. तर, इतर लोकल ट्रेन १२ डब्यांच्या स्वरूपात धावत आहेत. वाढत्या गर्दीमुळे या लोकल सेवांवर मोठा ताण येत असून, १५ डब्यांच्या लोकलची मागणी मागील काही महिन्यांत अधिक जोर धरत आहे. लवकरच ही मागणी पूर्ण होण्यच्या मार्गावर आहे.

सध्या सीएसएमटी कल्याण मार्गावर १५ डब्यांच्या लोकलच्या अंदाजे २२ फेऱ्या धावतात. मात्र, कल्याण - कसारा आणि कल्याण खोपोली मार्गावर अनेक स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी पडत असल्यामुळे १५ लोकल गाड्या चालवत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेशातील ३४ स्थानकांच्या विस्ताराचे काम सुरूये. त्यापैकी २७ स्थानकांचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्यची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक स्थानके कल्याण - कर्जत - खोपोली आणि कल्याण - कसारा या मार्गांवर आहे. सुरूवातीच्या टप्प्यात १२ डब्यांच्या लोकल गाड्यांचे १५ डब्यांमध्ये रूपांतर केले जाईल. पुढे त्याची संख्या टप्प्याटप्प्याने वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT