Mumbai Local  x
मुंबई/पुणे

Mumbai Local : 'ऑफिसच्या वेळा बदला' 800 कार्यालयांना मध्य रेल्वेचं विनंतीपत्र, गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेची धडपड

Mumbai : दिवा- मुंब्रा अपघातात पाच जणांच्या मृत्यूनंतर गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेची धडप़ड सुरु झालीय. त्यात मध्य रेल्वेनं शासकीय आणि खासगी कार्यालयाना एक पत्र पाठवलयं.

Suprim Maskar

Mumbai News : लोकलमधील गर्दीमुळे फूटबोर्डवरुन उभं राहून लटकत, लोंबकळत जीव मुठीत धरुन प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय उरलेला नाही,अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया असते. अशातच मध्य रेल्वेनं गर्दीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेनं मुंबईतील 800 पेक्षा जास्त खासगी कार्यालयांसह शासकीय कार्यालय, महविद्यालय आणि बँकांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र पाठवलेय. तसचं राज्य सरकारनेही या विषयात हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. मात्र मध्य रेल्वेतील लोकल गाड्यांच्या प्रवासाचं नियोजन नेमकं कसं असतं? पाहूयात..

मध्य रेल्वेचं नियोजन नेमकं कसं?

मुंबईत दररोज 1810 लोकल फेऱ्या

प्रवासी संख्या 35 लाखांपेक्षा जास्त

स्वस्त आणि जलद वाहतूक सेवा असल्यानं दिवसेंदिवस गर्दीत वाढ

सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या वेळांत नियोजनाचा अभाव

परिणामी सकाळी आणि संध्याकाळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी

गर्दीचे विभाजन करून ती कमी करण्यासाठी पत्रातून विनंती

दरम्यान मध्य रेल्वेतील सीएसएमटी, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सुटणाऱ्या गाड्याचं नियोजन कसं आहे? पाहूयात...

मध्य रेल्वेच्या रोजच्या लोकल फेऱ्या

मुख्य मार्ग- 894 फेऱ्या

हार्बर मार्ग- 614 फेऱ्या

ट्रान्स हार्बर- 262 फेऱ्या

पोर्ट मार्ग- 40 फेऱ्या

मालगाड्यांची वाहतूक- 106

मध्य रेल्वेवरील नियोजित फेऱ्यांमुळे नव्या रेल्वे मार्गिकेसाठी जागाच उपलब्ध नाही. अशात बहुसंख्य मुंबईकर काम-धंद्यासाठी दररोज सीएसएमटीपर्यंत प्रवास करतात. परिणामी लोकलवरील ताण वाढतोय. त्यामुळे कार्यालयीन वेळेत बदल करणे आवश्यक ठरलं. दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना ताजी आहे.

मुंबई उपनगर रेल्वे ट्रॅकवर मागील दोन वर्षांत किती जणांचा मृत्यू झालाय? याची आकडेवारी समोर आलीय.

रेल्वे अपघातात दररोज 7 जणांचा मृत्यू

गेल्या 20 वर्षात 51 हजार 802 जणांचा बळी

पश्चिम रेल्वेदरम्यान 22 हजार 481 जणांचा मृत्यू

मध्य रेल्वेदरम्यान 29 हजार 321 जणांचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या कल्याण, ठाणे स्थानकात सर्वाधिक मृत्यू

पश्चिम रेल्वेच्या वसई ,बोरिवली स्थानकात सर्वाधिक मृत्यू

मुळात नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना लोकलशिवाय पर्याय उरत नाही. त्यात प्रशासकीय पातळीवर कार्यालयीन वेळेच्या बदलाबाबत निर्णय घेतल्यास सर्वसामान्य नोकरदार त्या निर्णयाबद्दल काय भूमिका घेतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र कार्यालयीन वेळा बदलण्याशिवाय गर्दी व्यवस्थापनासाठी दुसरा कोणताच पर्याय नाही का? हा प्रश्न उरतोच..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxmi Narayan Rajyog: चंद्राच्या राशीमध्ये बनणार लक्ष्मी नारायण योग; धनलाभास करियरमध्ये मिळणार उत्तम संधी

Success Story: आईपण भारी देवा! प्रेग्नंट असताना दिली स्पर्धा परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात IPS; शहनाज इलियास यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update : उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार

Free Mobile Scheme: केंद्र सरकार देणार मोफत स्मार्टफोन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Wednesday Horoscope : बाहेरचे पाणी आणि खाण्यापासून राहा सावध, अन्यथा...; 'या' राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

SCROLL FOR NEXT