Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai local train mega block update : मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर शनिवारी आणि रविवारच्या मध्यरात्री विशेष पॉवर ब्लॉक ठेवण्यात आला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्टेशनवर पादचारी पूल गर्डर्स डी-लाँच करण्यात येत आहे. यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारीच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक चालवण्यात येणार आहे. या पॉवर ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या दुसऱ्या ट्रॅकवर वळविण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे १४० टी क्रेन वापरून अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर आणि सहाव्या मार्गाचा समावेश असलेल्या ठाणे स्टेशनच्या गर्डर्स डी-लाँचिंग करण्यात येणार आहे. यासाठी २१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तब्बल ६ तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. यामुळे अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात येणार आहे. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

ब्लॉक दिनांक:

दि. २१/दि. २२.०९.२०२४ (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)

ब्लॉकचा कालावधी:

२२.३० ते ०४.३० वाजता - (०६.०० तास) अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्ग आणि सहाव्या मार्गावर

ट्राफिक ब्लॉक विभाग:

अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्ग: कोपर खैरणे (प्लॅटफॉर्म वगळून) ते ठाणे (प्लॅटफॉर्मसह)

सहाव्या मार्गावर: दिवा ते मुलुंड (क्रॉसओव्हर वगळून)

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन:

सहाव्या मार्गावर चालणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा ते मुलुंड/विद्याविहार स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

कामायनी एक्स्प्रेस

मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

मडगाव- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस

गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस

गोरखपूर - मुंबई कुशीनगर एक्स्प्रेस

जयनगर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

भुवनेश्वर - मुंबई कोणार्क एक्स्प्रेस

शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज :

या पॉवर ब्लॉकमुळे ठाण्यातून शनिवारी रात्री २२.०१ ते ००.०५ वाजेपर्यंत वाशी/पनवेल करिता सुटणाऱ्या लोकल ट्रेन आणि ठाण्याकरिता वाशी येथून २१.३७ ते पनवेल २३.१८ वाजेपर्यंत जाणाऱ्या सेवा रद्द राहतील.

ट्रान्सहार्बर लाईनवर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोक ट्रेन ही ठाण्यातून २१.४१ वाजता सुटेल. त्यानंतर वाशीत २२.१० वाजता पोहोचेल. तर अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही वाशीतून २१.२४ वाजता सुटेल आणि ठाणे येथे २१.५३ वाजता पोहोचेल.

डाऊन ट्रान्सहार्हर मार्गावर ब्लॉक झाल्यानंतर पहिली लोकल ठाण्यातून ०५.१२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०६.०४ वाजता पोहोचेल.

अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशीतून ०६.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०६.५९ वाजता पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT