हातात पिस्तूल घेऊन गुंडाचा जन्मदिवस साजरा; एकाला अटक सागर आव्हाड
मुंबई/पुणे

हातात पिस्तूल घेऊन गुंडाचा जन्मदिवस साजरा; एकाला अटक

हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांपैकी एकाला अटक

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

पुणे- पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसा Birthday दिवशी टोळक्याने तलवारी आणि पिस्तूल Gun हवेत फिरवत साजरा केला आहे. दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन डान्स करत असल्याचे समोर आले आहे. भावेश कांबळे Bhavesh Kamble या सराईत गुंड गुंडाचा वाढदिवस साजरा करताना टोळक्याने दहशत माजवली आहे.

खून झालेल्या सराईत गुंडाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी कट्टा Gun हस्तगत करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

अक्षय उर्फ प्रसाद कानिटकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे  नाव आहे. सराईत गुन्हेगार भावेश कांबळे या सराईत गुन्हेगाराचा मागील वर्षी खून झाला होता. या घटने प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. खून झालेल्या आरोपीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सात जुलै रोजी 10 ते 15 लोकं जमले होते. त्यांनी हातात शस्त्र घेऊन आणि डान्स करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

तसेच, आरोपीच्या नावाने घोषणाबाजी केली होती. जमलेल्यांमध्ये अक्षय देखील सहभागी होता. अक्षय हा बिबवेवाडीतील दत्त मंदिराजवळ असल्याची माहिती पोलीस कर्मचारी उत्तम तारू आणि मितेश चोरमाले यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील Kranti Kumar Patilआणि त्यांच्या  पथकाने एकाला अटक केली. एक गावठी कट्टा आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बिबवेवाडी पोलिसांकडे दिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT